भिवंडी पिंपळास येथील धनश्री म्हात्रे या विद्यार्थिनीस वकृत्व स्पर्धेत रौप्यपदक !!
भिवंडी, संदीप शेंडगे : तालुक्यातील मौजे पिंपळास येथील शिवम हॉस्पिटलचे डॉ. नवनीत विठ्ठल म्हात्रे व डॉ. सोनाली नवनीत म्हात्रे यांची कन्या कुमारी धनश्री म्हात्रे या विद्यार्थिनीस संपूर्ण भारतातून घेण्यात आलेल्या मेडिकल वक्तृत्व स्पर्धेत रौप्यपदक मिळाल्याने भिवंडी कराची मान उंचावली आहे. ही वक्तृत्व स्पर्धा भारती विद्यापीठ आणि मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल महाराष्ट्र येथे भरविण्यात आली होती. या वक्तृत्व स्पर्धेत भारतातील नामांकित कॉलेजमधील शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनीनी सहभाग घेतला होता. कुमारी धनश्री ही एम.बी.बी.एस शिक्षण घेत आहे, तिला संपूर्ण भारताच्या मेडिकल विद्यार्थी स्पर्धेत राष्ट्रीय असेंब्लीमध्ये ओप्पथोलोजी (डोळ्याविषयी ) आजार व उपचार हा विषय देण्यात आला होता.
शरीरात व्हिटॅमिनची कमतरता असेल तर त्याचा डोळ्यावर होणारा परिणाम या विषयावर तिने ऑनलाइन स्पर्धेमध्ये वक्तृत्वाच्या जोरावर इतंभूत शास्त्रोक्त संदर्भासहित माहिती सादर केली. या वक्तृत्व स्पर्धेत आपल्या आई वडिलांच्या मार्गदर्शनाने तसेच शिक्षकांच्या सहकार्याने विविध डोळ्यात संबंधी आजार व उपचार याविषयी सखोल माहिती घेतली व ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत उत्कृष्ट पद्धतीने सादर केली. या स्पर्धेत धनश्रीला रौप्य पदक मिळाल्याने महाराष्ट्राचे नाव लौकिक झाले आहे, तिच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अशा प्रकारे धनश्रीने महाराष्ट्राचे व भिवंडी शहराचे नाव लौकिक केले आहे असे पिंपळास येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
No comments:
Post a Comment