५५ वी कनिष्ठ आणि वरिष्ठ कलात्मक जिम्नॅस्टिक्स राज्य स्पर्धेत डोंबिवलीतील भोईर जिमखान्याचे सुयश !!
डोंबिवली, हेमंत रोकडे : ५५ वी कनिष्ठ आणि वरिष्ठ कलात्मक जिम्नॅस्टिक्स (Artistic Gymnastic) राज्य स्पर्धा २०२१-२२ दिनांक २३ आणि २४ एप्रिल २०२२ रोजी ५५ वी कनिष्ठ आणि वरिष्ठ कलात्मक जिम्नॅस्टिक्स राज्य स्पर्धा २०२१-११, २३ आणि २४ एप्रिल २०२२ रोजी शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे पार पडली.
या स्पर्धा महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक संस्था अंतर्गत आयोजित केल्या होत्या. स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील २० जिल्हातुन १४८ खेळडू तसेच ५० पंच आणि प्रशिक्षक यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेमध्ये अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच शिवछत्रपती पुरस्कारारर्थी यांनी उपस्थित होते. स्पर्धच्या संचालनाची संपूर्ण जबाबदारी आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण ढगे यांनी पार पडले.
हया स्पर्धेत भोईर जिमखाना खेळो इंडिया अकादमी खालील खेळाडूंनी प्रतिनिधित्व केले. आणि १ सुवर्ण, ११ रौप्य, ५ कांस्य, एकूण १७ एवढी पदके मिळवली. सानिका अत्तर्डे व्हॉल्ट-रौप्य, बॅलन्स बीम - सुवर्ण, ऑलराउंडर – कांस्य आणि संघ-कांस्य, मनेश गाढवे ह्याने पोमेल हॉर्स - रौप्य, आडव्या पट्टी - रौप्य , ऑलराउंडर - सिल्व्हर आणि टीम - रौप्य, हिमांशू म्हात्रे स्टिल रिंग - कांस्य, ऑलराउंडर - रौप्य, टीम रौप्य पदके मिळवून विशेष कामगिरी बजावली.
यात मानस घोडेकर ( सिल्व्हर ), कृष्णा घोडेकर ( सिल्व्हर ), मंगेश घोडेकर ( सिल्व्हर ), हिमांशू म्हात्रे (ब्रोन्स ), अथर्व टेमकर ( सिल्व्हर ), संस्कार मंचेकर ( सिल्व्हर), नेहा दांडेकर ( ब्रोन्स ), सानिका अत्तेकर ( गोल्ड, सिल्व्हर आणि ब्रोन्स ) आणि कोमल धाके (ब्रोन्स ) या डोंबिवली भोईर जिमखान्यातील खेळाडूंनी यश संपादित केले. ८ ते १० मे २०२२ दरम्यान अंबाला कॅंट, हरियाणा येथे आयोजित सिनियर आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स नॅशनल आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स (MAG आणि WAG) मध्ये सहभागी होणार आहे. राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्यासाठी जिम्नॅस्ट हिमांशू म्हात्रे, मनेश गाढवे, अथर्व टेमकर, सानिका अत्तर्डे, व्यवस्थापक नंदकिशोर तावडे, भक्ती तिवारी, पंच पवन भोईर, केतकी गोखले यांची सदस्यांची निवड करण्यात आली आहे सर्व विजेते खेळाडूंचे ठाणे जिल्हा जिम्नॅस्टिक अससोसिएशचे अध्यक्ष व भोईर जिमखान्याचे संस्थापक मुकुंद भोईर व माजी आमदार रमेश पाटील आणि वरिष्ठ प्रशिक्षक रवींद्र शिर्के आणि नंदकिशोर तावडे यांनी सर्वांचे अभिनंदन केले. महाराष्ट्र राज्य हौशी जिम्नॅस्टिक संघटनेचे सचिव मकरंद जोशी व सचिव संजय शेटे यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा उत्साहाने पार पाडल्या.
No comments:
Post a Comment