भिवंडीतील नारपोली उप वाहतूक शाखे तर्फे अभिनव उपक्रम, वाहतूक नियम उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकां कडूनच जन जागृती मोहीम !!
भिवंडी, दिं,22,अरुण पाटील (कोपर) :
पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग, ठाणे शहर चे श्री. बाळासाहेब पाटील यांच्या आदेशाने भिवंडीतील नारपोली उपवाहतुक शाखे तर्फे वाहतूक नियमन संदर्भात जन जागृती उपक्रम नुकताच राबवण्यात आला होता.
वाहन चालकांना कडून सिग्नल तोडल्यामुळे (जंपिंग) मोठ्या प्रमाणात अपघात घडत असतात तसेच हेल्मेट व सिटबेल्ट न वापरल्याने होणाऱ्या अपघातामध्ये मृत्यूचे प्रमाण ७०% पर्यंत आहे. त्यामुळे मोटार वाहन कायद्या बाबत जन जागृती व्हावी या साठी शुक्रवार दि २२/४ रोजी संपुर्ण ठाणे आयुक्तालयात सकाळी ८ः०० वा. पासून संध्याकाळी ५ः०० वा पर्यंत विशेष मोहीम राबविन्यात आली होती.
या मोहीमे अंतर्गत ठाणे आयुक्तालयातील १८ वाहतुक उपविभागीच्या हद्दीत विविध ठिकाणी विशेष तपासनी मोहीम सुरु करन्यात आले सिग्नल तोडणारे, हेल्मेट व सिटबेल्ट न लावलेल्या वाहनधारकाला त्याने केलेल्या मोटार वाहन कायद्याच्या उल्लंघनाबाबत माहिती दिली व त्यामुळे होणाऱ्या धोक्या संदर्भात समुपदेशन करू जन जागृती केली.
या वेळी भिवंडीतील नारपोली उप वाहतूक शाखेकडून वाहन चालकांना कडून झालेल्या चुका इतर वाहन चालकान कडून होऊ नये यासाठी नारपोली उप वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.ज्ञानेश्वर आव्हाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सोमनाथ कर्णवर, पोलीस उपनिरीक्षक श्री.सचिन खताळ, पोलीस उपनिरीक्षक श्री. श्याम पाटील या सर्वांनी वाहतुक शाखेने तयार केलेले संदेश फलक वाहन धारकांना दाखवून रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती केली.
या मोहीमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकाना या जन जागृती मोहिमेत सहभागी करुन घेऊन वाहतूक नियमांचे उल्लंघन करू नका, दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करा, बिना सीटबेल्ट वाहन चालऊ नका, सिग्नल तोडू नका असे व इतर वाहतूक नियमांचे बॅनर त्यांच्या हातात देऊन इतर वाहन चालकांना दाखऊन त्यांची जन जागृती केली.
ज्या वाहन धारकांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले मात्र जनजागृती साठी आपले योगदान दिले नाही त्या वेळेस त्यांचेवर ई चलानच्या माध्यमातुन मोटारवाहन कायद्याच्या उल्लंघनाबाबत कार्यवाही करुन तात्काळ दंड वसूल केला .
सर्व वाहनधारकांनी आपले कडून मोटारवाहन कायद्याच्या कोनत्याही नियमांचा भंग होणार नाही या बाबत दक्षता घ्यावी अन्यथा नियम मोडणाऱ्यानवर वाहतूक नियमा प्रमाणे कड्क कार्यवाही करन्यात येईल असा इशारा नारपोली उप वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानेश्वर आव्हाड यांनी सदर वेळेस दिला आहे.


No comments:
Post a Comment