औरंगाबाद मधील मनसे पदाधिकाऱ्यांकडून ५० भोंगे खरेदी, भोंगे " न " काढल्यास मशिदी समोरच्या मंदिरांवरच वाजवणार भोंगे.--मनसे
भिवंडी, दिं,२७, अरुण पाटील (कोपर) :
मशिदींवरील भोंगे न काढल्यास त्यांच्या समोरील मंदिरावरच भोंगे लावून हनुमान चालिसा पठण करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकाऱ्यांनी भोंग्यांची खरेदी सुरू केली आहे.
पहिल्या टप्प्यात मशिदीं समोरच्या मंदिरांतच भोंगे वाजवण्याचे नियोजन आहे. यासाठी बॅटरीवर चालणाऱ्या अत्याधुनिक भोंग्यांची खरेदी सुरू असून औरंगाबादमध्ये ५० भोंगे दाखल झाले आहेत. राज्यभरातही स्थानिक पातळवर खरेदी सुरू आहे.
मनसेच्या २ एप्रिल २०२२ च्या मुंबईतील गुढीपाडवा मेळाव्यात राज यांनी ज्या मशिदीबाहेर भोंगे लागतील, त्याच्या समोर दुप्पट आवाजात लाऊड स्पीकरवर हनुमान चालिसा लावण्याचे आवाहन केले होते.
मनसेच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज आहेत. सर्व शहरांत स्थानिक पातळीवर भोंग्यांची खरेदी सुरू केली आहे.
पदाधिकारी स्वखर्चातून त्यांना शक्य तेवढे भोंगे खरेदी करत आहेत. शासनाने ३ तारखेपर्यंत ठोस भूमिका नाही घेतली तर पहिल्या टप्प्यात मशिदीं समोरच्या मंदिरांवरच भोंगे लावले जानार आहेत .
शहरात मशिदीं जवळील मंदिरांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे.पुढच्या टप्प्यात मशिदी समोर मंदिर नसणाऱ्या ठिकाणी पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या घरावर भोंगे लावले जाणार आहेत .
औरंगाबादेतील पदाधिकाऱ्यांनी १५०० ते १८०० रुपये दराने पुण्यातून ५०-५५ भोंग्यांची खरेदी केली आहे. आता भोंग्यांसाठी वीज, सीडी प्लेअर आदी लागत नाही. बॅटरीवरील भोंग्यांतच amplifayr अॅम्प्लिफायर आहे. ते पेनड्राइव्ह वा ब्ल्यूटूथनेही कनेक्ट होतात. वजनाने हलके असल्याने सहज उचलून गच्चीवर ठेवता येतात. स्पीकरवरही हनुमान चालिसा वाजवण्याचे नियोजन आहे.
-----------
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आम्ही स्थानिक पातळीवर भोंग्यांची खरेदी सुरू केली आहे. तीन तारखेला मशिदींवरील भोंगे बंद नाही झाले तर कोणत्याही परिस्थितीत आमचे भाेंगे जोरातच वाजतील.'
(आशिष सुरडकर, शहराध्यक्ष, मनसे, औरंगाबाद )
भोंगे काढण्यासाठी राज ठाकरे यांनी तीन मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. तोपर्यंत राज्याने कारवाई न केल्यास नेमके काय करायचे हे ते १ तारखेच्या सभेत सांगतीलच. आमच्याकडेही यासाठी प्लॅन बी, सी नव्हे तर "आर' म्हणजेच राज ठाकरे प्लॅन तयार आहे.
(साहेब सांगतील ते आम्ही करू.' बाळा नांदगावकर, मनसे नेते)
No comments:
Post a Comment