Wednesday 27 April 2022

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या प्रस्तावावर घेतली गंभीर दखल. "रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा शेतकरी नेते, अशोकराव जाधव, अरुणा प्रकल्पग्रस्त संघटनेचे सेक्रेटरी अजय नागप यांनी घेतली मंत्री महोदयांची मंत्रालयात भेट"

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या प्रस्तावावर घेतली गंभीर दखल !

"रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा शेतकरी नेते, अशोकराव जाधव, अरुणा प्रकल्पग्रस्त संघटनेचे सेक्रेटरी अजय नागप यांनी घेतली मंत्री महोदयांची मंत्रालयात भेट"


मुंबई, बातमीदार :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील अरुणा प्रकल्पाची बेकायदेशीरपणे घरभरणी करून त्यात पाणीसाठा केल्याने पाण्यात बुडालेल्या सुमारे 130 पेक्षा जास्त घरांचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात आणि राज्याचे पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्यासमोर मांडण्यात आला असून याची गंभीर दखल मंत्रीमहोदयांनी घेतले आहे. कार्यकारी अभियंता हर्षल यादव, अधीक्षक अभियंता विजय थोरात, आणि पुनर्वसन अधिकारी अमोलसिंह भोसले यांना वस्तुनिष्ठ अहवाल सादर करून मंत्रालयात मिटींगला बोलवा असे लेखी आदेशच मंत्रिमहोदयांनी दिले आहेत.


काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि शेतकरी नेते अशोकराव जाधव आणि लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा संघटनेचे सेक्रेटरी अजय नागप यांनी या प्रश्नावर मंत्री महोदयां यांचे लक्ष वेधले आहे.त्याची गंभीर दखल मंत्रीमहोदयांनी घेतली आहे.

या बाबतचे  सविस्तर वृत्त असे मोबदला नाही, भुखंड नाही, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि स्थलांतर केलेले नसताना तसेच कालवे तयार नसताना २०१९ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी पांढरपट्टे, अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, कार्यकारी अभियंता राजन डवरी, आणि अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक या अधिकाऱ्यांनी गावातील काही दलालांना हाताशी धरून अरुणा प्रकल्पाची एका महिन्यात मे २०१९ मध्ये घळभरणी पूर्ण करून धरणात पाणी साठा केला केल्याने; आखवणे, नागपवाडी, भोम गावातील प्रकल्पग्रस्तांची सुमारे ३६ रहाती घरे धरणाच्या पाण्यात बुडालेली आहेत. रात्री १२ वाजता गावात आणि घरात धरणाचे पाणी घुसल्याने प्रकल्पग्रस्त जीव वाचवण्यासाठी गावातून बाहेर पडलेले आहेत.

पाण्यात बुडालेल्या घरांची नुकसान भरपाई मिळावी व कायद्याप्रमाणे पुनर्वसन करण्यात यावे या मागणीसाठी लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे, अजय नागप, प्रकाश सावंत, विलास कदम, राजेंद्र नागप, सुर्यकांत नागप, यांच्या नेतृत्वाखाली गेली चार वर्षे धरणे, मोर्चे, आंदोलने, आणि प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला जात आहे. असे असतांना या प्रकल्पात एकही घर बुडाले नाही असे रिपोर्ट डवरी, जोशी, पांढरपट्टे, या अधिकाऱ्यांनी शासनाला सादर केलेले आहेत. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच या अधिकाऱ्यानी या जिल्ह्यातून अन्यत्र बदल्या करून पळ काढला आहे.

आता अधीक्षक अभियंता विजय थोरात, कार्यकारी अभियंता हर्षल यादव, बदली होऊन आलेले आहेत. हे अधिकारी जिल्ह्यात रुजु झाल्यानंतर गेली दोन वर्षे या अधिकाऱ्यांना प्रकल्पग्रस्तांनी सहकार्य केले. गोड बोलून धरणाचे उर्वरित काम अहोरात्र सुरू ठेवून पूर्ण करून घेतले. मात्र घरांच्या प्रश्नावर या अधिकाऱ्यांनी गोड बोलून प्रकल्पग्रस्तांशी चर्चा सुरु ठेवत. मुळ प्रश्न तसाच लोंबकळत ठेवला आहे. या अधिकाऱ्यानी आता प्रकल्पाचे काम संपताच मागील अधिकाऱ्यांची री ओढत एकही घर बुडाले नसल्याचे कारण सांगत आहेत.

कार्यकारी अभियंता हर्षल यादव, अधीक्षक अभियंता विजय थोरात यांनीच मार्च २०२२ मध्ये अरुणा प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू ठेवला होता. त्यामुळे धरणातील पाणीसाठा पुर्ण कमी झाला आणि आखवणे, नागपवाडी, भोम गावातील प्रकल्पग्रस्तांची तब्बल चार वर्षानंतर सुमारे 130 पेक्षा जास्त घरे धरणाच्या पाण्यातून जशीच्या तशी पाण्याबाहेर आलेली आहेत. या घरांची पाहणी करण्यात यावी आणि प्रकल्पग्रस्तांना बुडालेल्या घरांची नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी अरुणा प्रकल्प गेले दोन टाहो फोडत आहेत. पाऊस तोंडावर आलेला आहे. पुन्हा पाऊस पडला आणि ही घरे पाण्याखाली गेली तर ती पुन्हा कधीच दिसणार नाही. त्यामुळे तातडीने या घरांची पहाणी करावी ही मागणी सुद्धा कार्यकारी अभियंता आणि अधीक्षक अभियंता मान्य करायला तयार नाहीत. ते वेळकाढूपणा करीत असुन पावसाची वाट पहात आहेत. या संदर्भात गेल्या महिनाभरात अनेक बैठका झाल्या परंतु वेळकाढू पणा करण्याचे काम वरील अधिकारी करत आहेत असा आरोप प्रकल्पग्रस्त करीत आहेत.

अरुणा प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन न करता ज्या पद्धतीने त्यांचे हाल करण्यात आले.आणि त्यांना न्याय दिला जात नाही. याची गंभीर दखल रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शेतकरी नेते अशोकराव जाधव यांनी घेतली आहे. काल २६ एप्रिल २०२२ रोजी त्यांनी रत्नागिरी वरून अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत ते थेट मंत्रालयात पोहोचले. त्यांच्यासोबत संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा संघटनेचे सेक्रेटरी अजय नागप होते. काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते व शेतकरी नेते अशोकराव जाधव यांनी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि पुनर्वसन मंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांची मंत्रालयात भेट घेतली. अरुणा प्रकल्पग्रस्तांची प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने वाट लावली आणि अन्याय केला त्याचे पुरावेच सादर केले.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी उपलब्ध कागदपत्र, वर्तमानपत्रातील बातम्यांची कात्रणे, आणि धरणाच्या पाण्यातुन तब्बल चार वर्षानंतर बाहेर आलेल्या घरांचे फोटोग्राफ्स पाहिल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि स्थलांतर केल्याशिवाय कायद्याने प्रकल्पाची घळभरणी करताच येत नाही. मग हे बेकायदेशीर काम कसे करण्यात आले असा सवालच मंत्रीमहोदयांनी उपस्थित केला आहे.

कार्यकारी अभियंता राजन कार्यकारी अभियंता हर्षल यादव, अधीक्षक अभियंता विजय थोरात, आणि जिल्हा पुनर्वसन अधिकारी अमोलसिंह भोसले यांच्याकडे वस्तुनिष्ठ अहवाल मागवून त्यांना मंत्रालयात मिटींगला बोलावण्याचे आदेशच मंत्री महोदयांनी दिले आहेत.

गेली चार वर्ष अरुणा प्रकल्पग्रस्त त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या बाबतीत आक्रोश करीत आहेत. माजी आमदार, शेतकरी नेते दिवंगत पितृतुल्य पुष्पसेन सावंत यांच्या शिवाय कोणीही दखल घेतलेली नाही. सर्वस्व गमावलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत कोणीही सहाणुहोती दाखवलेली नाही. परंतु आता शेतकरी नेते असलेले रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव जाधव यांनी सोशल मीडिया, युट्युब चॅनेल, आणि वर्तमानपत्रांच्या बातम्यांच्या आधारे अरुणा प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधत मंत्री महोदया समोर हा गंभीर प्रश्न मंत्री उपस्थित केला आहे. तेवढीच गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश दिले आहेत. यामुळे अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. काही दिवसातच पावसाळा सुरू होणार असल्याने याबाबतची मंत्रालयात तातडीने बैठक व्हावी अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली असुन ज्येष्ठ नेते अशोकराव जाधव यांचे अरुणा प्रकल्पग्रस्तांनी आभार मानले आहेत.
१ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर अरुणा प्रकल्पग्रस्तांचे अन्नत्याग आंदोलन शेतकरी नेते अशोकराव जाधव यांनी शब्द दिल्यामुळे पुढे ढकलण्यात आले आहे.

अस्तित्वाचा संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे :

 📞 -  7507966260


1 comment:

भिवंडी लोकसभा मतदारसंघात माझा विजय निश्चित - भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) काल महाविकास आघाडीच्या मतदारसंघा...