बजरंग शांताराम तांगडकर सर्वसामान्य कुटुंबातील असामान्य सामाजिक राजकीय प्रवास...
*संगमनेर तालुका ते कल्याण व्हाया लालबाग- घाटकोपर*
बजरंग शांताराम तांगडकर सर्व सामान्य कुटुंबातील तरूण गेली अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आरोग्य, कला, क्रीडा, राजकीय क्षेत्रातील कार्यरत असून त्यांचा वाढदिवसानिमित्त निमित्त घेतलेला त्यांच्या कार्याचा आढावा,
जेष्ठ पत्रकार शिवचरित्र व्याख्याते, वडील शांताराम तांगडकर जे शेतकरी कुटुंबात आंबीखालसा, ता. संगमनेर जि. अहमदनगर येथे जन्मगाव कै. रखमाजी चिमाजी तांगडकर यांचे चिरंजीव ७ भावंडे असलेले जोड कुटुंब असलेला मोठा परिवार या घरांमध्ये इतर भाऊ पुणे, मुंबई, संगमनेर येथे स्थायिक असा मोठा प्रपंच, वडीलांनी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ मध्य नोकरी करत, पत्रकारिता करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला सामाजिक, राजकीय पत्रकारिता क्षेत्रात १९६८ पासून शालेय आंदोलन पासून सुरूवात कार्यरत, सन १९८५ ला विद्यमान महसूल मंत्री व त्याकाळचे अपक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारात स्वर्गीय एडवोकेट सुदामराव आहेर ,माजी न्यायमूर्ती सुमंत कोल्हे यांच्याबरोबर ज्येष्ठ पत्रकार शांताराम तांगडकर यांनी संगमनेर मतदारसंघ पिंजून काढला वक्ता म्हणून महत्त्वाची भूमिका बजावलली व आमदार बाळासाहेब थोरात प्रथम आमदार म्हणून निवडून आले,
त्यानंतर १९८८ साली तत्कालीन आमदार बाळासाहेब थोरात आमदार आदिवासी विकास मंत्री राज्यमंत्री मधुकररावजी पिचड, सहकार महर्षी कै. प्रभाकर भोर यांच्या उपस्थितीत महर्षी दयानंद विद्यालय परेल येथे साप्ताहिक नवस्फूर्ती वृत्तपत्राचे प्रकाशन करण्यात आले नवस्फूर्ती साप्ताहिक, विशेषांक दिवाळी अंक, तेथून लालबाग, घाटकोपर कल्याण असा दिर्घ प्रवास केला..
घाटकोपर मध्ये दादा म्हणून ओळख असलेले पत्रकार शांताराम तांगडकर यांचे पत्रकार क्षेत्राबरोबरच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही त्यांचा मोलाचे योगदान असो आहे स्थानिक शिवसेना नगरसेवक शुभांगी शिर्के शिर्के यांच्या नेहमी पाठीशी राहत निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावत ४ वेळा व दशरथ शिर्के १ वेळा, तर संगमनेर तालुक्यातील आंबीखालसा ग्रामपंचायत सुरेश कान्होरे यांना चार वेळा निवडून आणण्यात मोलाची भूमिका बजावली
आता त्यांचे चिरंजीव बजरंग तांगडकर सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांचा हा प्रवास, लालबाग -घाटकोपर, भटवाडी इथून सुरू होतो मोठे कुटुंब असल्याने वयाच्या ३ वर्षा पासून १९८६ पासून मुंबईत स्थायिक झाले, चाळीत १०×१० रूम मध्ये रूम मध्ये भांवडे, चुलता, चुलती सोबत राहत बर्वे नगर महानगरपालिका शाळा क्रमांक ३ मध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले, पुढे रामनिरंजन झुनझुनवाला कॉलेजमध्ये पदवी घेतली, त्यानंतर एअरलाइन क्षेत्रांमधील डिप्लोमा पदवी घेत जेट एअरवेज सारख्या देशातील नामांकित कंपनीमध्ये नोकरी केली तर आता इंटरियर, एक्स्टरियर, सिव्हिल क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय करत आहे..
घरामध्ये वडील पत्रकार व सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे घरात नेहमीच सामाजिक वातावरण कोणाच्याही सुख दुःख मध्ये सहभागी होत ,कोणाचेही काम आले तर कोणतीही अपेक्षा न ठेवता तत्परतेने कशी, सोडवता येईल यासाठी नेहमीच धडपड ,कोणाला मंत्रालयातून शिफारस पत्र, कोणाला शाळा कॉलेज येथे शिफारस पत्र, कुणाला नोकरी लावणे, कोणी कुठे कधी अडचणीण त्यासाठी मदत करणे असे नेहमीच मदतीची भावना त्यांच पावलांवर पाऊल ठेवत त्यांचे चिरंजीव बजरंग तांगडकर आज सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहे त्यांच्या सामाजिक व राजकीय जीवनाची खरी सुरुवात २०११ जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या देशातील भ्रष्टाचार विरोधी आंदोलन आंदोलनात ठाणे येथे सहभाग घेऊन झाली,
पुढे मराठा क्रांती मोर्चा आंदोलन ना मधील कल्याण, ठाणे ,मुंबई येथे मोर्चा व समन्वयक म्हणून सहभाग, २०१५ निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेमध्ये नगरसेवक निवडून आणण्यासाठी दया गायकवाड यांचे प्रचार प्रमुख म्हणून धुरा सांभाळली,
कार्यकर्ता ते वार्ड अध्यक्ष - कल्याण शहर उपाध्यक्ष असा राजकीय प्रवास, २०१५-२०१९ केंद्रीय मंत्री खासदार कपिल पाटील साहेब, माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या निवडणुकांना प्रचारात नेहमीच अग्रेसर राहिले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सीएम चषक च्या माध्यमातून शाळांमध्ये चित्रकला, स्पर्धा रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, काव्य स्पर्धा मध्ये सहभाग नोंदवला भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक उपक्रमांमध्ये, आंदोलनामध्ये सहभाग नोंदवत पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी सदैव प्रयत्न करत राहिले.
बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, मतदार नोंदणी असो शासनाचे उपक्रम असो भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र प्रदेश स्तरावर राबवलेले विविध कार्यक्रम पोहोचविण्याचे कार्य अतिशय प्रामाणिक, कष्ट आणि जिद्दीने केले वेळप्रसंगी कुटुंबाकडे कधी-कधी दुर्लक्ष होते परंतु त्यांच्या रक्तात व मनात असलेली कार्याची आवड व पॅशन त्यांना शांत बसून देत नव्हती घरात थांबून देत नव्हती.
भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये सदैव क्रियाशील राहत प्रत्येक उपक्रमांमध्ये ,आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला कार्यकर्ता- वार्ड अध्यक्ष ते शहर उपाध्यक्ष असा प्रवास करत सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व ज्येष्ठ नेते यांच्या संपर्कात राहत विविध उपक्रम आपल्या प्रभागात राबवण्याचे कार्य केले त्याचबरोबर जमिनीवर राहत प्रत्येक तरुणांच्या ,नागरिकांच्या संपर्कात त्यांच्या समस्या जाणून घेऊन सोडवल्या आहे स्फूर्ती फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते गरजू नागरिकांना रक्तदानाचे मदत होईल.
गौरीपाडा टावरी पाडा येथील शंकेश्वर प्रेसिडेन्सी येथे वास्तव्यास असलेल्या सोसायटीमध्ये मागील अनेक वर्षांपासून विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रिडा मनोरंजन, उत्सव, पुढाकार अतिशय थाटामाटात मध्ये साजरी करण्यात येतात विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती, गणपती उत्सव, नवरात्र उत्सव यामध्ये नेहमी अग्रेसर राहत या माध्यमातून काही ना काही सामाजिक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे तसेच पंचशिल मित्र मंडळ माध्यमातून साजरी करण्यात येत असलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती च्या सुरुवातीच्या स्थापनेमध्ये ही त्यांनी पुढाकार घेत तेव्हापासून आजपर्यंत ही त्यांचा नेहमीच सहभाग असतो, शंकेश्वर प्रेसिडेन्सी ६५० सदनिका असलेल्या फेडरेशनचे सचिव असून तेथील छोट्या-मोठ्या समस्या कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या संबंधित समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर असतात.
मराठी शाळांमधील काही कुटुंबातील आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांची फी भरणे शक्य नव्हते त्यासाठी पुढाकार घेत विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मुलांची फी भरण्यात आले. कोरोना संकटामध्ये मागील तीन वर्षांपासून सर्वांचीच परिस्थिती हालाखीची आहे पूअनेकांच्या नोकऱ्या गेल्या उद्योगधंदे ठप्प झाले शाळा बंद कॉलेज बंद त्यामुळे सर्व कडे जी परिस्थिती उद्भवली होती या परिस्थितीमध्ये स्फूर्ती फाउंडेशन व शंकेश्वर मित्र मंडळाच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना मदत देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला ज्यामध्ये अन्नधान्य वाटप असो , पोलीस बांधवना सुरक्षा किट,सोसायटीमधील नागरिकांना अल्प दरामध्ये भाजीपाला उपलब्ध, करून देणे असो डी मार्ट किराणा सुविधा उपलब्ध करून देणे असो ,माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या माध्यमातून औषध फवारणी आर्सेनिक गोळ्या उपलब्ध करून दिली नागरिकांना कोरोना झाल्यानंतर अनेक नागरिक पेशंट जवळ जात नव्हते परंतु त्यांनी पेशंटच्या जवळ जात त्यांना आधार देण्याचा त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला.स्फूती फाउंडेशन च्या माध्यमातून दरवर्षी महाराष्ट्रातील विविध शहरात क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा गुणगौरव व सन्मान हिरकणी पुरस्कार देऊन केला जातो या माध्यमातून खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण व सबलीकरण करण्याचा उद्देश स्फूर्ती फाउंडेशनचा आहे दरवर्षी स्फूर्ती फाउंडेशन दिनदर्शिका माध्यमातून कार्याचा प्रचार आणि प्रसार लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करत असतात...
स्फूर्ती फाउंडेशन च्या माध्यमातून सामाजिक ,शैक्षणिक, आरोग्य कला क्रीडा ,क्षेत्रात विविध उपक्रम राबवत गरजू नागरिकांना आधार देण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये कोल्हापूर मधील आलेला पूर असो ,कल्याण मध्ये आलेला पूर असो सदैव मदतीची भावना मनात ठेवत आधार देण्याचा प्रयत्न केला, तसेच झेप प्रतिष्ठान ठाणे या सामाजिक संस्थेच्या सोबत राहत विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला हिवाळ्यामध्ये रस्त्यावर झोपणाऱ्या ब्लँकेट वाटप , आदिवासी पाड्यांवर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप असो, असे अनेक उपक्रम राबवत प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते सक्रिय राहिले
त्यांचे कार्य फक्त कल्याण पुरते मर्यादित नसून त्यांचे गाव असलेल्या संगमनेर तालुका जिल्हा अहमदनगर आंबी खालसा मुक्काम तांगडी येथेही आहे .. संपूर्ण जग आधुनिकतेकडे वळत होतो व त्यांच्या गावातील साधी मोबाईल नेटवर्क सुद्धा नव्हते फोनही लागत नव्हता आपण एवढ् शिक्षण घेऊन मोठे झालो परंतु जर आपण आपल्या मातृभूमीसाठी काही करू शकलो नाही तर त्याच्या इतकी खंत कोणतीच नसेल हि भावना ठेवत २०१६ साली संगमनेर तालुक्यातील पठार भागांमध्ये मोबाईल नेटवर्क सुविधेसाठी सर्व शासकीय, खाजगी कंपनीकडे पाठपुरावा केला, स्थानिक आमदार नामदार बाळासाहेब थोरात अकोले तालुका आमदार वैभव पिचड यांच्याकडे पत्रव्यवहार केला आणि आपल्याला हि सुविधा मिळत नाही त्याचा रोष हा बाहेर आला आजूबाजूच्या सर्व गावांना एकत्रित करत मूळ खोरे पठार भाग संघर्ष समिती माध्यमातून २०१७ साली सर्व पक्षिय आंदोलन पुणे -नाशिक हायवे वर मोबाईल टॉवरवर चढून प्रशासना विरुद्ध निषेध केला हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचत सर्व माध्यमांनी याची दखल घेतली यामध्ये काँग्रेसचे सत्यजित तांबे, जि.प. सदस्य अजय फटांगरे, शिवसेना तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, मनसे नगर जिल्हा उपाध्यक्ष किशोर डोके यामध्ये सहभागी झाले हे आंदोलन करून फक्त न थांबता औरंगाबाद येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात मध्ये रिट याचिका दाखल करत प्रशासनाला मोबाईल सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भाग पाडले त व खासगी कंपन्यांना पत्रव्यवहार करत त्यांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भाग पाडले तसेच युवा विकास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य स्थापन करत तांगडी आंबीखालसा गावातील काही प्रमुख समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित होत्या ज्या काही तांत्रिक अडचणीमुळे असो या काही जागी अभावी या पूर्ण होत नव्हता हि मनात खंत होती त्यासाठी व्हिजन तांगडी २०२० संकल्प करत विविध विषय सोडवण्यासाठी एक व्हीजन तयार केले यामध्ये श्री ईश्वरेश्वर देवस्थान ३.५ किलोमीटरचा रस्ता वन विभागाच्या माध्यमातून व माजी आमदार वैभव पिचड यांच्या सहकार्याने पूर्ण केला ,तसेच आंबीखालसा तांगडी येथे वर्षानुवर्ष स्मशानभूमी ला जागा उपलब्ध होत नव्हती ती जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न युवा विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आला नदीवर अंत्यसंस्कार होते यामध्ये अनेक पाहुणे ,नागरिकांना पावसाळ्यात अडचणी येत होत्या नुकतेच त्या स्मशानभूमीच्या काम पूर्ण झालेले आहे त्याच बरोबर तांगडी परिसरामधील दरेवाडी येथे पावसाळ्यामध्ये ओढ्याला पुरासारखे पाणी येत होतं नागरिकांची मागणी होती तेथे पूल झाला पाहिजे यासाठी माजी आमदार वैभव पिचड आमदार किरण लहामटे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला या पुलासाठी नुकताच आमदार किरण लहामटे यांच्या निधीतून १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला भविष्यामध्ये श्री ईश्वेश्वर देवस्थान हे पर्यटन स्थळ व्हावे भव्य असे मंदिर असा संकल्प पासून फक्त ही मंदिर नसून न राहता येथे गोरगरीब गरजू नागरिकांची विवाह पार पडले पाहिजे या मंदिराच्या माध्यमातून आरोग्य सुविधा व गरजू लोकांना आधार भेटला पाहिजे या उद्देशाने हा संकल्प राबवण्याचा त्यांचा एक प्रयत्न आहे.. असे विविध सामाजिक शैक्षणिक आरोग्य कला क्रीडा क्षेत्रातील प्रत्येक क्षेत्राला त्यांनी स्पर्श करत नेहमी सदैव कार्यरत राहिले यामागे खऱ्या अर्थाने त्यांच्या घरातील कुटुंबाचाही साथ मिळत वडील ज्येष्ठ पत्रकार शांताराम तांगडकर करतो त्यांची ,पत्नी शिल्पा तांगडकर ज्या स्वतःचा पार्लरचा व्यवसाय,त्यांची आई शारदा तांगडकर बंधू सुनिल तांगडकर, सुभाष तांगडकर, प्रसाद तांगडकर, ऋषिकेश तांगडकर प्रविण तांगडकर कुटुंबातील चुलते दिनकर तांगडकर, रामदास तांगडकर, नामदेव तांगडकर,जावई संतोष वाकळे, गणेश अरगडे, राजेश काळे ,किशोर चाळक, दिपक धावडे ,मंगेश फापाळे..बहिण मनिषा वाकले ,सुरेखा अरगडे ,प्रज्ञा तांगडकर,आरती त्यांना साथ देण्याच्या नेहमी प्रयत्न केलेला आहे जुन्नर तालुक्यातील सासू शांता कुटे,कारभारी कुटे, विनोद कुटे व संपूर्ण कुटे परिवाराची खंभीर साथ लाभत आहे.. कै. सिताराम तांगडकर ,कै भास्कर तांगडकर यांचा बजरंग तांगडकर यांच्या जीवनामध्ये लहानपणापासून जडणघडणीमध्ये ही सोबत राहिली आहे .. खऱ्या अर्थाने त्यांचे आजोबा कै. रखमाजी चिमाजी तांगडकर यांची शिकवण होती नेहमी चांगले कार्य करायचे ,समाजामध्ये चांगले राहायची चांगल्या लोकांच्या सहवासात राहायचे कोणाचे वाईट करायचे नाही कोणाचे वाईट चिंतायचे नाही एवढं चांगलं कार्य करा कि कोणी विचारल तर रखमा तांगडकर चा नातू असं सांगताना मला अभिमान वाटला पाहिजे अशी त्यांची इच्छा होती..तेच आचार, विचार शिकवण घेऊन बजरंग तांगडकर कार्यरत आहेत वाढदिवसानिमित्त काहीतरी विशेष उपक्रम राबवावा अशी त्यांची मनोमन इच्छा होती कोरोना मध्ये अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत ,उद्योगधंदे ठप्प झाले आहे या निमित्ताने त्यांनी भव्य रोजगार मेळावा त्याचबरोबर ज्या शासकीय योजना गरजू नागरिकांपर्यंत, विधवा महिला, अपंग व दारिद्र रेषेखाली नागरीकांना पोहोचत नाही त्यांचा खऱ्या अर्थाने त्यांना लाभ होत नाही अशांसाठी सर्व शासकीय योजनांचे शिबीर, सर्व शासकीय कागदपत्रांचा शिबिर व आरोग्य शिबिराचे आयोजन केलेले आहे त्याच्यामध्ये आरोग्य तपासण्या, रक्त तपासणी, अल्प दरात शस्त्रक्रिया होणार आहे त्याचबरोबर रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये रस्ता, वीज, पाणी या नित्यनेमाचे या अनेक वर्षांपासून असलेल्या समस्या आहेत त्या आहेत आणि चालतही राहतील परंतु कोरोनाने जे आर्थिक नुकसान झाले आहे ते भरून काढण्यासाठी आता भविष्यामध्ये खऱ्या अर्थाने गरज आहे त्या आर्थिक सक्षमीकरणाची प्रत्येक कुटुंबाचे, प्रत्येक व्यक्तीचे नोकरी असो वा व्यवसाय मिळाला पाहिजे उद्देश घेऊन बजरंग तांगडकर व शिल्पा तांगडकर वाढदिवसानिमित्त संकल्प केला आहे.. असा हा सर्वसामान्य कुटुंबातील बजरंग तांगडकर यांचा थक्क करणारा प्रवास नेहमीच युवा तरुणांना स्फूर्ती देणारा व प्रेरणा देणारा ठरेल यामध्ये संदेह नाही..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन....
ReplyDeleteबजरंग,अभिनंदन....खूप मोठा हो....यशवंत,गुणवंत हो....
ReplyDeleteWish You Many Many Happy Returns Of The Day Bajrang Dada🍰🍰🍰🍰🍫🍫🍫🍫🍬🍬🍬🍬🌹🌹🌹🌹🌹
ReplyDelete