गुरुकृपा कॉलेज ऑफ एज्युकेशन ॲण्ड रिसर्च महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ संपन्न !!
कल्याण, (सौजन्य) इंडिया टि. व्ही : रोजी शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित गुरुकृपा कॉलेज ऑफ एज्युकेषन ॲण्ड रिसर्च कल्याण पश्चिम येथील वर्ष 2019-2021 मधील बी.एड् व एम.एड्. विद्यर्थ्यांचा पदवीदान समारंभ संपन्न झाला.
यावेळी समारंभाचे प्रमुख पाहुणे डी.बी. वीर सर (संस्थापक, शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई), डॉ. पंकज वीर सर, (सचिव, शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई) यांनी भूषविले तसेच डॉ. व्ही.एस. शेट्टी सर (मुख्याध्यापक डी.एस.डी. स्कूल), सचिन आवळे सर (मुख्याध्यापक, ब्रायटन वर्ल्ड स्कूल), संजय दरगुडे सर (विभाग प्रमुख, गुरुकृपा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय), महेंद्र सोनावणे (मुख्याध्यापक, प्राथमिक विद्यालय), प्रतिक्षा पवार (विभागप्रमुख, डी. एस.डी. प्रायमरी स्कुल, कल्याण) कार्यक्रमास उपस्थित होते.
दिपप्रज्वलनानंतर महाविद्यलाय प्राचार्य, डॉ. विद्युलता कोल्हे मॅडम यांनी महाविद्यलायाच्या 2020-21 या वार्शिक अहवालाचे वाचन केले.
वर्ष 2021-22 मधील एम.एड्. विद्यार्थ्यांनी साकारलेले टेक्नो प्लॅनेट’ या मासिकेचे व बी.एड्. विद्यार्थ्यांनी साकारलेले ‘आझादी का अमृत महोत्सव’ या विषया अंतर्गत तयार केलेल्या मासिकांचा अनावरण सोहळा डी.बी.वीर सर आणि डॉ. पंकज वीर सर यांच्या हस्ते पार पडला. वर्ष 2019-21 मधील महाविद्यालयातील मुंबई विद्यापीठ अंतर्गत बी.एड्. व एम.एड्.परिक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते पदवी वाटप करण्यात आले. बी.एड. विभागातून प्रथम क्रमांक प्राप्त प्रज्ञा पटनाईक, एम.एड्. विभागातून प्रथम क्रमांक प्राप्त- रोहीत तोमर, डी.एल.एड्. विभागातून प्रथम क्रमांक प्राप्त दिक्षा सिंग आणि 2020-21 मधील महाविद्यालयीन विद्यार्थी अर्चना पवन भोईर सेट परिक्षा उत्तीर्ण व शेख खलिदा मुखतार सेट व नेट परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल स्मृतीचिन्हं आणि प्रमाणपत्र देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित केले.
महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. पंकज वीर सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ज्ञानाचा सदुपयोग कसा करावा आजच्या परिस्थितीला सामोरे कसे जावे याबाबत विविध उदाहरणाद्वारे उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामधून कार्यक्रमाच्या नियोजनाविषयी कौतुक केले व जुन्या आठवणींना उजाळा दिला. महाराष्ट्राची परंपरा राखणारे कोळी नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले. सदर कार्यक्रमास उपस्थित संस्थेतील सर्व विभागांचे विभाग प्रमुख मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थी यांनी समारंभ यशस्वी करण्यासाठी योगदान दिले. आभारप्रदर्शन डॉ. नितीन गाढे यांनी केले. अशा प्रकारे आनंदी वातावरणात पदवीदान समारंभ संपन्न झाला.
No comments:
Post a Comment