बौद्धजन सहकारी संघ पिंपर विभाग तर्फे पालशेत येथे सर्व महापुरुष व महामाता यांची संयुक्तिक जयंती उत्साहात साजरी !!
[ निवोशी/गुहागर- उदय दणदणे ] :
बौद्धजन सहकारी संघ, विभाग क्र.०५ (पिंपर विभाग) यांची रविवार दि.२४ एप्रिल २०२२ रोजी शाखा क्र.३९, पालशेत, ता. गुहागर येथे सर्व महापुरुष व महामाता यांची संयुक्तिक जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली.
सदर कार्यक्रमाची सुरुवात विभागाचे अध्यक्ष आयु. दिलीप सदाशिव जाधव (अडूर) यांच्या हस्ते धम्माचे प्रतीक असलेला पंचरंगी ध्वज फडकावून करण्यात आली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची लेखणी प्रतीक निळ्या ध्वजाचे पालशेत शाखेचे अध्यक्ष आयु. मनोज नागे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
सर्व महापुरुष व महामाता यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आल्यानंतर पालशेत शाखेतील लहान मुलांनी त्यांच्या सुमधुर वाणीने धम्म पूजा पाठ पठण केले. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर व प्रमुख वक्ते म्हणुन आयु. लंकेश गजभिये सर (प्राध्यापक, पाटपन्हाळे महाविद्यालय, गुहागर), तालुक्यातील प्रशिक्षित श्रामणेर सुप्रिय शशिकांत जाधव (वरवेली), रुपेश सुरेश सावंत (गुहागर), निलेश चंद्रकांत गमरे (चिखली) तसेच मध्यवर्ती गाव कमिठीचे चेअरमन आयु. विश्वनाथ कदम (पाटपन्हाळे), सरचिटणीस आयु. महेंद्र मोहिते (कौढर), चिटणीस विश्वास मोहिते (पवार साखरी), विश्वस्त आयु. राजेश पवार (वाघांबे), उपाध्यक्ष व विभाग ०५ चे सल्लागार आयु. संतोष दामले (साखरी आगर), विभाग क्र.०५ चे अध्यक्ष आयु. दिलीप सदाशिव जाधव (अडुर), उपाध्यक्ष आयु. मिलिंद पवार (वाघांबे), सरचिटणीस आयु. प्रशांत कदम (उमराठ), कोषाध्यक्ष आयु. प्रभाकर मोहिते (पालशेत), विभाग अधिकारी आयु. संजय जाधव (हेदवी), माजी विभाग अधिकारी आयु. उदय जाधव (हेदवी), तालुका व विभाग माजी कार्यकर्ते आयु.वसंत कदम (उमराठ), आयु. दत्ताराम कदम (पिंपर), आयु. सुभाष जाधव (अडुर), आयु. विनायक कदम (उमराठ), आयु. अशोक नागे (पालशेत), आयु. विनायक नागे (पालशेत), आयु. जगन्नाथ मोहिते (पालशेत), आयु. निलेश नागे सर (पालशेत), आयु. दीपक पवार (तवसाळ), आयु. अनंत जाधव (अडुर), आयु. दीपक नागे (पालशेत), त्यानंतर महिला ग्रामपंचायत सदस्या आयु. नि. समिक्षा शैलेश घाग ( पिंपर ), आयु. नी. मधुरा मनोज नागे (तवसाळ), आयु, नि. सायली संजय जाधव (हेदवी), या सर्व मान्यवरांचा विभाग क्र.५ तर्फे सत्कार करण्यात आला. त्यानंतर विभागातील विद्यार्थी व महिलांनी महापुरुष, महामाता यांच्या जीवनावर भाषणे केली. त्यांना विभागामार्फत प्रमाणपत्र व वस्तू भेट देऊन गौरविण्यात आले, त्यानंतर विभागातील १०वी, १२वी, पदवी, तसेच इतर क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थी, महिला व पुरुष यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यामध्ये पालशेत शाखेतील कु. श्रावणी अशोक नागे हिने १४ एप्रिल २०२२ रोजी गुहागर येथे जिल्हास्तरीय ज्युनियर ज्युडो स्पर्धेत ५२ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक संपादन केले तसेच ४८व्या राज्यस्तरीय ज्युनियर ज्युडो स्पर्धा २०२२ (पुणे) मध्ये निवड झाली त्याबद्दल तिचे अभिनंदन, तसेच आयुष प्रशांत मोहिते (पालशेत) शिरगाव येथील प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला, श्रुती संतोष नागे (पालशेत) हिने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा प्रथम क्रमांक पटकावला, तसेच प्रसाद मनोज नागे (पालशेत) व सोनिया मनोज नागे (पालशेत) यांनी गणित विषयामध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले. तसेच महिला ग्राम पंचायत सदस्या, सर्व श्रामणेर यांच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल प्रशस्ती प्रत्रक व भेटवस्तू देऊन सर्वांना गौरविण्यात आले.
तसेच पालशेत शाखेतील महिलांनी विभागातील महिलांकरिता स्नेहमेळावा आयोजित केला होता, त्याला सर्व महिलांनी उस्फुर्त प्रतिसाद दिली. प्रमुख प्रवक्ते प्रा. लंकेश गजभिये यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय विचार व सद्या अस्तित्वात त्यांच्या विचारांची होत असलेली पायमल्ली, खास करून राजकीय नेते गटबाजी करून समाजाची, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची करीत असलेली विभागणी यांवर प्रकाश टाकला. तसेच स्पर्धा परीक्षा बाबतीत मार्गदर्शन केले तसेच श्रामनेर सुप्रीय शशिकांत जाधव यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची अनेक पुस्तके सर्वां समोर आपल्या उत्तम शैलीत मांडली व सर्वांना मंत्रमुग्ध केले. अशा प्रकारे अनेक मान्यवर यांनी आपले विचार मांडले व शेवटी अध्यक्ष दिलीप जाधव यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विभागाचे सरचिटणीस प्रशांत कदम यांनी केले व त्यांना कोषाध्यक्ष प्रभाकर मोहिते यांनी उत्तम साथ दिली.
No comments:
Post a Comment