भातगावात दुमदुमली प्रति पंढरपूर ! जुगाईदेवी मंदिर जीर्णोद्धार सोहळ्याला भाविकांची उपस्थिती लक्षवेधी !!
[ निवोशी/गुहागर- उदय दणदणे ] :
गुहागर तालुक्यातील भातगाव वाशीयांचे ग्रामदैवत श्री जुगाई देवी मंदिराचे जीर्णोद्धार सोहळा दिनांक- २१ ते २७ एप्रिल २०२२ पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. धार्मिक विधी सहित विविध कार्यक्रम या निमित्ताने होणार आहेत. दिनांक २१ एप्रिल २०२२ रोजी भातगाव मध्ये गावदेवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
भातगावच्या इतिहासातील सुवर्ण क्षण *न भूतो न भविष्यती* म्हटल तरी वावग ठरणार नाही. देवीच्या मिरवणुकीची सुरुवात भातगाव पुलापासून सुरू झाली. गावातील प्रत्येक वाडीतील ग्रामस्थांनी वेगवगळी वेशभूषा तसेच महिलांनी एकसमान परिधान केलेली वेशभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेणारं होते.
फुलांची, गुलालाची उधळण ढोल-ताशांचा गजर, बेंजो , डीजे यांनी संपूर्ण वातावरण अगदी भक्तीमय झाले होते. प्रत्येकजण आई जुगाई च्या जयघोषात तल्लीन झाला होता. मिरवणुकीच्या शेवटी देवीच्या मंदिरा जवळ येऊन देवीची आसने सानेवर ठेवून मिरवणुकीची सांगता करण्यात आली. लक्षवेधी ठरलेली ही मिरवणूक भातगाव वाशीयांना अगदी स्मरणीय असणार आहे.
No comments:
Post a Comment