Friday, 29 April 2022

अंगणवाडी कर्मचारी यांच्या उन्हाळी सुट्टीमध्ये कपात !! "महिला बालकल्याण खात्याचा आयुक्त रुबल अग्रवाल यांचा जाहीर निषेध"

अंगणवाडी कर्मचारी यांच्या उन्हाळी सुट्टीमध्ये कपात !! 

"महिला बालकल्याण खात्याचा आयुक्त रुबल अग्रवाल यांचा जाहीर निषेध"


चोपडा, बातमीदार.. कोरोना काळापूर्वी दरवर्षी अंगणवाडी सेविकांना मे महिन्यात पंधरा दिवस सुट्ट्या देण्याच्या प्रघात होता. तो मोडीत काढण्याचा पराक्रम एकात्मिक बाल विकास प्रकल्प श्रीमती रुबल अग्रवाल यांनी केला याबद्दल निषेध करणारे पत्रक महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक जळगाव जिल्हा शाखेने काढले आहे. 


याबाबत सविस्तर असे की, गेली पंचवीस वर्षे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्टी १५ दिवसाची देण्यात येत होती, ती गेले दोन वर्ष कोरोना वर्षात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सुट्ट्या देण्यात आल्या नाहीत. 

त्यातच कोरोणा काळात जीव धोक्यात घालून अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अंतर्गत सर्व कामावर सांभाळून कोरोना काम देखील केले. 

यावर्षी कुठे त्यापासून मुक्ती मिळत आहे आणि अशावेळी एकात्मिक बालविकास प्रकल्प खात्याच्या आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल यांनी पंचवीस वर्षाची पंधरा दिवस उन्हाळी सुट्टी देण्याची परंपरा मोडून काढली जणू काही *गर्मी मे भी लगे थंडी का एहसास* व फक्त सात दिवस सुट्ट्या जाहीर केले आहेत यावर्षी विदर्भात, खानदेशात ४६ डिग्री तापमान आहे पण त्यात मुलांना बोलवा असे सांगणे संयुक्तिक वाटत नाही. एअर कंडीशन खाली उन्हाळा घळवनाऱ्या आयुक्तांना है काय समजणार? ९५ टक्के अंगणवाडी केंद्रात पंखेची सोय नाही. उन्हाळ्यात वर्ग चालवणे म्हणजे बालकांना  उन्हाळातील आजार देण्याचे निमंत्रणच होय असे सांगून अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या पत्रकात म्हटले आहे की आम्ही, त्यांना जानेवारीपासून केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती परंतु कागदोपत्री घोडे नाचणाऱ्या आयुक्त यांनी आमच्या मागणी लक्षच दिले नाही.. 

तरी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांचे सुट्टीत आठ दिवसाची कपात करणाऱ्या महिला बाल विकास आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या जाहीर निषेध करणारे पत्रक जळगाव जिल्हा अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन तर्फे कॉम्रेड अमृत महाजन,  प्रेम लता पाटील, सुमित्रा बोरसे, मीनाक्षी काटोले, अनिता बोरसे, वत्सला पाटील, चित्रा वारे, सुनंदा पाटील, सुलक्षणा पाटील, सुलेखा पाटील, सुरेखा पाटील, अश्विनी देशमुख, लक्ष्मी तायडे,  नूरणीसा फरिन, उषा पाटील आदींनी काढले आहे

No comments:

Post a Comment

एक बातमी आणि मी  गुरुवार दिनांक नऊ जानेवारी २०२५ रोजी इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था, यांनी एक अभूतपूर्व यशस्वी प्रयोग घडवून आणला...