जिल्हा परिषद स्थापना हिरक महोत्सव समारंभ कल्याण पंचायत समितीच्या वतीने उत्साहात साजरा, पत्रकारांचा गौरव !
कल्याण, (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद स्थापनेस १ मे २०२२ रोजी ६० वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर हिरक महोत्सव साजरा करण्याच्या शासनाकडून सूचना मिळताच कल्याण पंचायत समितीच्या वतीने सभागृहात मोठ्या उत्साहाने हा सोहळा आयोजित केला होता. यावेळी तालुक्यातील जेष्ठ पत्रकार संजय कांबळे यांचा यथोचित गौरव करण्यात आला. त्यांच्या सह माजी सभापती, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांच्या ही सन्मान करण्यात आला.
सकाळी प्रथम सभापती रेश्मा मुकेश भोईर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, त्यानंतर पंचायत समितीच्या सभागृहात सन्मान, सत्कार, गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दिप प्रज्वलन व राष्ट्र पुरुषांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण केल्यानंतर कल्याण माझी सभापती माधुरी वाळिंबे, सदाशिव गायकर, व्याखाते संदिप पाटील.
सेवानिवृत्त अधिकारी, देसाई नाना, राजश्री दोंदे, सुलभा सातपुते, प्रविण माळोदे, नितीन घोडके, सामाजिक कार्यकर्ते मधूकर वाळिंबे, शिपाई, राहूल कांबळे, आदी कर्मचारी व अधिका-याचा सन्मान करण्यात आला. तर कल्याण तालुक्यातील जेष्ठ पत्रकार तसेच जि.प. व कल्याण पंचायत समितीच्या विविध योजना, कार्यक्रम यांना सदैव, प्रसिद्धी व सहकार्य करणा-या संजय कांबळे यांचा गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी शाल, श्रीफळ गुलाब पुष्ष व तूळशीचे रोप देऊन विशेष गौरविण्यात आले.
व्याखाते संदिप पाटील यांनी महाराष्ट्र निर्मिती चा इतिहास सांगितला, राष्ट्रसाठी हुतात्मे झालेल्या वीरांची आठवण व्हायलाच हवी असे सांगून महाराष्ट्र ही साधूसंताची, समाजसुधारकांची, नररत्नांची, वीरांची भूमी आहे, त्यांच्या मुळे आपण हे सुवर्ण दिन पाहतोय, असे ते म्हणाले, यावेळी त्यांनी काही ओळी सादर करुन वातावरण निर्मिती केले.
कल्याण पंचायत समितीच्या सभापती रेश्मा भोईर, माझी सभापती माधुरी वाळिंबे, दर्शना जाधव, आदी नी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
गटशिक्षणाधिकारी सुनिता मोटघरे यांनी जिल्हा परिषदे बाबत माहिती दिली तर पत्रकार संजय कांबळे यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना अत्यंत चांगली लिहिली आहे, परंतु त्यांची अंमलबजावणी करणारे चांगले नसतील तर ते यशस्वी कसे होतील असे सांगून आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करूया असे सांगितले.
शेवटी गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले, ते म्हणाले, महाराष्ट्र राज्यामध्ये १ मे १९६२ मध्ये त्रिस्तरीय कार्यपध्दती अस्तित्वात येवून जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची स्थापना करण्यात आली, त्यास आज १ मे २०२२ रोजी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. ही अभिमानाची गोष्ट आहे, म्हणून च आपण आज या दिवशी अनेकांचा सत्कार केला, यावेळी कामाचा आढावा देखील घेण्यात आला.
या अतिशय सुंदर देखण्या कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, व्यक्ती, मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोनावणे सर यांनी अंत्यत काव्यात्मक रुपाने महाराष्ट्राचे वर्णन करत या सोहळ्याचे सुत्रसंचालन केले त्यामुळे कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
No comments:
Post a Comment