Sunday, 1 May 2022

कल्याण शाळेतील विद्यार्थ्यांचा राज्य पुरस्काराने गौरव !

कल्याण शाळेतील विद्यार्थ्यांचा राज्य पुरस्काराने गौरव !


कल्याण, बातमीदार -  आज दिनांक १ मे महाराष्ट्र दिन रोजी साकेत मैदान, ठाणे येथे पार पडलेल्या कार्यक्रमांमध्ये माननीय पालकमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते होली क्रॉस इंग्लिश हायस्कूल नांदिवली कल्याण या शाळेतील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र स्काऊट गाईड च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्य पुरस्कार या परीक्षेमध्ये शाळेतील ६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन प्राविण्य प्राप्त केले त्यामुळे मा. पालकमंत्र्यांच्या हस्ते स्काऊट अश्विन अर्जुन नायर यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 

तसेच राज्य पुरस्कार परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सुजित चौधरी, प्रथमेश ढोणे, आदित्य होळकर, हर्ष निंबाळकर, यश पाल या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 

सर्व विद्यार्थ्यांना स्काऊट मास्टर विजेता रहाटे व मुख्याध्यापिका यशोदा नाईक मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment

कोकण सुपुत्र कवी,लेखक अशोक लोटणकर यांच्या "निराधार" पुस्तकाचे प्रकाशन !

कोकण सुपुत्र कवी,लेखक अशोक लोटणकर यांच्या "निराधार" पुस्तकाचे प्रकाशन ! ** २५ कथांचा कथासंग्रह अमित प्रकाशनातर्फे झाला प्रकाशित  ...