Tuesday 31 May 2022

कानसे ग्रुपचा कलाकार "अनिल घवाळी" काळाच्या पडद्याआड "सखे शेजारी" ग्रुपच्या वतीने मुबंईत भावनिक वातावरणात शोकसभा संपन्न !

कानसे ग्रुपचा  कलाकार "अनिल घवाळी" काळाच्या पडद्याआड "सखे शेजारी" ग्रुपच्या वतीने मुबंईत भावनिक वातावरणात शोकसभा संपन्न !


निवोशी / गुहागर, उदय दणदणे :

_अनेक कलाकार मान्यवरांच्या उपस्थितीत अंधेरीत शोकसभा संपन्न._


दि. १४ मे २०२२ शनिवार रोजी पहाटे स्वर्गीय- अनिल घवाळी आणि त्यांचा मित्र स्वर्गीय- निलेश सकपाळ हे दोघे मुंबई ते महाड गावी बाईकवरून प्रवास करत असताना विक्रोळी गांधी नगर येथे बाईक आणि ट्रान्झिट मिक्सर ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यूमुखी पडले आणि त्यांच्या कुटुंबासहित संपूर्ण कलाक्षेत्रात शोककळा पसरली. नाटक नमन कला क्षेत्रातील हा एक उमदा, हौशी, हरहुन्नरी कलाकार असा अचानक जाण्याने रंगभूमीचा एक सेवक आपल्यातून हरपल्याची खंत कलाक्षेत्रात व्यक्त केली जात आहे.


      स्वर्गीय: अनिल घवाळी यांच्या परिवाराच्या दुःखात  सखे शेजारी ग्रुप सहभागी होऊन त्यांना आधार देत सखे शेजारी ग्रुप (मुंबई) वतीने त्याचबरोबर कानसे ग्रुप आणि कोकण टॉकीज समूहाच्या सहकार्याने  दिनांक ३० मे २०२२ सोमवार रोजी बालविकास शिक्षण संस्था अंधेरी-पूर्व मुबंई  येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. 


       शोकसभेची सुरुवात स्वर्गीय अनिल घवाळी यांचे प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. तद्नंतर उपस्थित जनसमूहातून अनेकांनी शोकसभा चिंतनपर श्रद्धांजली अर्पण करून आपल्या मनोगतातून स्वर्गीय अनिल घवाळी यांच्या आठवणीनां उजाळा दिला. अनेकांच्या नयनी अश्रू मनी कंट दाटून आला. 
       साई श्रद्धा कलापथक- मुबंई कानसे ग्रुप मधील एक स्मितहास्य, हुन्नरी कलाकार कलाक्षेत्रातील सर्वांचे लाडके भावोजी देवाने हिरावून घेतले. स्व.अनिल घवाळी ( भावोजी ) यांच्या अचानक जाण्याणे कानसे ग्रुपमध्ये पडलेली पोकळी कधीच भरून न येणारी आहे. स्वगिॅय-अनिल घवाली तालुका/ जिल्हा -रत्नागिरी गाव - उंडी 
कानसे ग्रुप मध्ये सक्रीय सहभाग घेऊन नमननाट्य निर्माते- लेखक दिग्दर्शक - संदिप कानसे यांच्या 
मार्गदर्शनाखाली नमननाट्य कलाकृतीतून अभिनय करत 
२००४ साली रंगमंचावर पदार्पण केला होता. पहिला प्रयोग "बळीचा अंत", "शेर गर्जाला चंबळखोरीचा ", रंगला सैतानी फास", "बंदुप्रेम", "जागा हो मराठ्या", "रत्तात रंगली राजगादी", "हिंदुस्थान जिंदाबाद", "हरहर महादेव", आणि शेवटच्या आठवणीतला यावर्षी चा वगनाट्य "चित्ता फाडला जावळीचा" , ..अशा वगनाट्यात भाग घेतला होता, स्व .अनिल घवाळी यांचा कलाक्षेत्रातील वावर पाहता त्यांचा चाहतावर्ग मित्रपरिवार खूप मोठा आहे. 
        सदर शोकसभेला त्यांचे कुटुंबीय भाऊ ,मेहुणे, मुलगा तसेच कलाक्षेत्रातील नामवंत शाहीर  -दिलीप नामे, दामोदर गोरीवले, चंद्रकांत साळवी, रमाकांत जावळे, अमोल भातडे, नितीन मास्कर, संदेश पालकर, सुभाष बांबरकर, सुशीला जावळे, तसेच शिवन्याताई  मांडवकर, विजय साळवी, राकेश जिमन, तसेच कानसे ग्रुपचे सर्वेसर्वा - लेखक /दिग्दर्शक- संदिप कानसे,  सुधाकर मास्कर- सचिव (नमन लोककला संस्था -भारत) उदय दणदणे - सदस्य (नमन लोककला संस्था -भारत ) समीर बलेकर आदी कलाकार, कवी , लेखक, आयोजक मंडळी उपस्थित होती.

No comments:

Post a Comment

महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज कल्याण लोकसभा मतदारसंघातून दाखल !!

महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज कल्याण लोकसभा मतदारसंघातून दाखल !! ** आदित्य ठाकरे यांचा रॅलीत सहभाग, जितेंद्र आव्हाड व ...