Tuesday 31 May 2022

मैत्रकुलच्या संकल्प मेळाव्याला उस्फुर्त प्रतिसाद !! "जागा घेण्यासाठी मदत करण्याचे मैत्रकुल संस्थापक किशोर जगताप यांचे आवाहन" *मैत्रकुल माझ्यासाठी मंदिर आहे*, उद्योजक संतोष जाधव यांचे प्रतिपादन...

मैत्रकुलच्या संकल्प मेळाव्याला उस्फुर्त प्रतिसाद !! "जागा घेण्यासाठी मदत करण्याचे मैत्रकुल संस्थापक किशोर जगताप यांचे आवाहन"

*मैत्रकुल माझ्यासाठी मंदिर आहे*, उद्योजक संतोष जाधव यांचे प्रतिपादन...


कल्याण, संदीप शेंडगे : बापगाव येथे भरविण्यात आलेल्या मैत्रीकुलच्या पाचव्या संकल्प मेळाव्याला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थिती दाखवली. कल्याण मधील एकही मुलगा व्यसनाधीन होवू नये या करीता किशोरदादा गणाई व मैत्रकुल अट्टाहासाने कल्याण मध्ये काम करीत आहेत. 

मैत्रकुलने कल्याण मधील काही मुलांचे जगणे तर बदलले पण कल्याणच्या नावाचा करिश्मा वाढवायला मैत्रकुलची मदत झाली असे कार्यक्रमाच्या उद्घाटनीय भाषणात माजी नगरसेवक व कल्याण विकासिनीचे अध्यक्ष उदय रसाळ यांनी व्यक्त केले व मैत्रकुलच्या हक्काच्या जागेसाठी पुन्हा एकदा पायाला भिंगरी लावेन असे गौरवोद्गार काढताच उपस्थितानी टाळ्यांचा कडकडाट केला. 

छात्रशक्ती संचालित मैत्रकुल या आधुनिक गुरुकुलास पाच वर्ष झाल्या निमीत्त बापगाव, कल्याण-भिवंडी येथे 29 मे या दिवशी "संकल्प मेळाव्याचे" आयोजन करण्यात आले, त्यास अनेक मैत्रकुल प्रेमींनी हजेरी लावली होती. त्यावेळी संस्थापक "किशोरदा गणाई (जगताप )" यांनी या वर्षात स्वतःच्या हक्काच्या जागेत जाण्याचा संकल्प जाहिर करताच मैत्रकुल प्रेमींनी त्यास जोरदार टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला व अनेकांनी मैत्रकुलदुत म्हणून निधी उभी करण्यासाठी तन मन धनाने काम करण्याचे आश्वासन दिले. पाच हजार लोकांनी एकदाच दोन हजार रुपये दिल्यास एक कोटी रुपये उभे राहतील व स्वतःची जागा घेण्यासोबत बांधकामही आपण एका वर्षात उभे करू. किशोरदा गणाई यांचा हा विश्वास आपण प्रत्यक्षात आणू ही खात्री अनेकांनी या निमीत्त आपल्या भाषणात दिली.

आजवर मी फक्त धार्मिक ठिकाणीच मदत करत होतो पण आजपासून सदैव पॉजिटीव एनर्जी देणाऱ्या मैत्रकुलला मी प्रायोरीटीने मदत देणार असे सांगून मैत्रकुलसाठी पन्नास हजारांची देणगी प्रसिद्ध उद्योजक संतोष जाधव यांनी जाहीर केले .
  
"प्रबोधनात्मक गीतांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली व  पुढे मैत्रकूल च्या अनेक विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य मैत्रकूल मुळे कसे घडले व बदलले याची ग्वाही दिली तसेच असंख्य हितचिंतकांनी मैत्रकूल बद्दल भरभरून भाष्य केले अशी माहिती कार्यक्रम प्रमुख श्रेया निकाळजे यांनी दिली. 

गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षणासाठी व सर्वांगीण विकासासाठी गुरुकुल पध्दतीने सुरू झालेले मैत्रकूल बघता बघता ०५ वर्षाचे झाले. मैत्रकूल "जीवन विकास केंद्र" ही अत्यंत आगळीवेगळी संकल्पना अनेक वर्षे वस्तीतील मुलांच्या शिक्षणासाठी बागशाळा चालवणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते "किशोर जगताप" यांच्या द्वारे १० मे २०१७ रोजी  सुरू झाली. मैत्रकूल ने  असंख्य गोरगरीब, होतकरू, ध्येयवादी विद्यार्थ्यांना एका अर्थाने विद्येच्या, मायेच्या, माणुसकीच्या सावलीखाली मोठं केलं आहे करत आहे आणि करत राहील. अशी माहिती ॲड. पूजा बडेकर यांनी दिली. 

एकेकाळी एक टोप, वाटी, चमचा, ताट घेऊन कल्याण मधील बापगाव येथील गायकर कंपाऊंड मध्ये ह्या प्रकल्पाची सुरुवात झाली. सुरुवातीला १५ मग ३० नंतर ५६ विद्यार्थी आणि बघता बघता कल्याण, पुणे, रायगड, सातारा अश्या विविध ठिकाणी मैत्रकूल च्या शाखा सामाजिक भान असलेल्या माणुसकी जपणाऱ्या अनेक लोकांनी आपली जागा काही वर्षाच्या करारावर देऊन  इथे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उभे राहत आहे अशी माहिती छात्रशक्ती खजिनदार विजेता भोनकर यांनी दिली. 

मैत्रकूल कडे स्वतःची जागा नसल्यामुळे वाचनालय, प्रयोगशाळा, स्टुडिओ, क्रिएटिव्ह झोन, टॉय लायब्ररी, मैदान अश्या विविध गोष्टी उभारता येत नाहीत. आज असंख्य विद्यार्थ्यांना इच्छा असूनही मैत्रकूलला आणता येत नाही कारण जागा लहान आहे. पण आम्हाला विश्वास आहे जर आपण सर्वांनी मोठ्या मनाने मदत केली तर हे सर्व शक्य आहे. अशी आशा छात्रशक्ती सेक्रेटरी स्मिता साळुंखे यांनी व्यक्त केली. 

मैत्रकूल च्या विद्यार्थ्यांनी आगळ्यावेगळ्या पध्दतीने  विविध क्रिएटिव्ह सेल्फी पॉईंट, रांगोळी बनवून तसेच गाणी, गीत व नृत्यांनी कार्यक्रम हसत खेळत पार पाडले.. अशी माहिती मैत्रकूल उपप्रमुख संचालिका मंजिरी धुरी यांनी दिली व मैत्रकुलला एकदाच दोन हजार रुपयांची मदत करण्याचे आवाहन केले या मोळाव्याच्या निमित्ताने ७,५०,००० रुपये जमा झाल्याचे घोषणा करताच मैत्रकुलच्या नावाने जोरदार घोषणा देण्यात आल्या.

No comments:

Post a Comment

महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज कल्याण लोकसभा मतदारसंघातून दाखल !!

महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज कल्याण लोकसभा मतदारसंघातून दाखल !! ** आदित्य ठाकरे यांचा रॅलीत सहभाग, जितेंद्र आव्हाड व ...