Tuesday, 31 May 2022

लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय सहसंघटक पदी दिपक मांडवकर यांची निवड !!

लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय सहसंघटक पदी दिपक मांडवकर यांची निवड !!


मुंबई, (शांताराम गुडेकर) :

       महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त असलेल्या लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय पद नियुक्ती दरम्यान सहसंघटक पदी श्री. दिपक मांडवकर यांची निवड झाली. बालपणापासून अन्यायाच्या विरोधात उभे राहून न्याय मिळवून देण्यासाठी उभे ठाकलेले दिपक मांडवकर रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुका येथील खानवली गावचे सुपुत्र आहेत. अगदी गरीब परिस्थितीत आपले शालेय शिक्षण पूर्ण करून मुंबईतील धगधगत्या जीवनाचे निखारे शेवटी चटके देत असताना जनसेवेचे वसा उराशी बाळगून गेले वीस वर्षे मुंबईत विविध प्रकारच्या गरजूनच्या अडचणी साठी व नागरिकांना, प्रसंगी समाज बांधवांना प्रत्येक वेळी अनमोल अशी साथ देत आहेत. विविध वर्तमान पत्रात वृत्त लेखन व सामाजिक अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळवून दिला व सामाजिक बांधिलकी जपली. अनाथ मुले व वृद्धाना विविध पध्दतीने सहकार्य केले. मुंबई ते केंद्रीय सदस्य पदभार सांभाळत असताना विविध संघटना स्थापन करून कार्य करत आहेत. अंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना ते ग्लोगल पीस कोन्सिल भारतीय महाक्रांती सेना, माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना, महाराष्ट्र सुपर फास्ट न्युज, जन पहारा वृतपत्र, कुणबी समाजोन्नती संघ, सांस्कृतिक कला क्रीडा, सामाजिक संघटना, रेल्वे प्रवाशी मंडळे, साई एकदंत रहिवासी सेवा संघ अंतर्गत तेवीस इमारती ते सामाजिक क्षेत्रात सर्वात पुढे येऊन गरजूना अधिकार मिळवून दिला आहे. या कामाची दाखल घेऊन विविध मंडळ, संघटना, प्रसारमाध्यमे, संस्था यांनी मांडवकर यांना विविध पुरस्कार, कोरोना योद्धा सन्मानपत्रने सन्मानित केले आहे आणि याच गतीच्या बळावर आज विविध क्षेत्रात ते  परीचीत आहेत. आज ३१ मे २०२२ रोजी त्यांची लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय सहसंघटक पदी निवड झाली. ही निवड झाल्याने यांचे संपूर्ण श्रेय आई बाबा व पत्नी आणि गुरुजनांना अर्पण करून मिळालेल्या पदाचा योग्य वापर करून लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या मा. अध्यक्ष सचिनजी बोंबले यांचे व पदाधिकारी मंडळींचे आभार मानले. जनसेवेला पुनच्छ नव्याने प्रारंभ करून माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाचे सोनं करून आवश्यक ती मदत करण्यासाठी मी सदैव तयार असेन असे श्री. दीपक तुकाराम मांडवकर यांनी मत व्यक्त केले. श्री. दीपक मांडवकर यांचे विविध संस्था, संघटना, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष पदाधिकारी आणि मुंबई, उपनगर तसेच ग्रामीण भागातून अनेकांनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

कोकणच्या कला संस्कृतीला वाव देण्यासाठी सुवर्ण-भास्कर नमन स्पर्धा २०२५ च्या बक्षीस वितरणचे २३ जुलैला मुंबई येथे आयोजन !!

कोकणच्या कला संस्कृतीला वाव देण्यासाठी सुवर्ण-भास्कर नमन स्पर्धा २०२५ च्या बक्षीस वितरणचे २३ जुलैला मुंबई येथे आयोजन !! ** शिवसेना नेते, वि....