कल्याण तालुक्यात अद्याप टँकर नाही, शहापूरात भयावह पाणी टंचाई, लाखो कोटींचा खर्च मंजूर ?
कल्याण, (संजय कांबळे) : सुर्यनारायण प्रचंड आग ओकत असल्याने तापमानात भयानक वाढ झाली आहे. याचा परिणाम म्हणून नदी नाले, ओहळ, झरे कोरडे पडत चालले आहेत. आणि यातून शहापूरात भयावह पाणी टंचाई निर्माण होत असून सुदैवाने कल्याण तालुक्यात अद्याप तरी टँकर ची मागणी झालेली नाही, असे असले तरी ही टंचाई दूर करण्यासाठी लाखो कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तो सत्कारर्णी लागावा व आमची पाण्याची 'भटकंती' थाबांवी ऐवढीच माफक अपेक्षा किशोर पंडित यांनी व्यक्त केली.
ठाणे जिल्ह्यात बारवी, भातसा, काळू, आणि उल्हास या प्रमुख नद्या आहेत, इतरही छोट्या मोठ्या उपनद्या आहेत परंतु या प्रमुख नदीच्या पाण्यावर महापालिका, नगरपंचायत, गावे, ग्रामपंचायत, पाडे अवलंबून आहेत. कल्याण तालुक्यातील १२४ महसुली गावातील ३० पाडे येथे नवीन विंधन विहीर घेण्यासाठी सुमारे २१ लाख रुपये, तसेच ३ गावे २ पाडे येथील नळ पाणी पुरवठा दुरुस्ती ९३ लक्ष रुपयांची टंचाई कृती आराखडा २०२२ मध्ये तरतूद करण्यात आली आहे. १८ ग्रामपंचायतींचा समावेश यात आहे, त्यामुळे सध्या तरी तालुक्यात तीव्र पाणी टंचाई नाही, सातवाडी, हि-याची वाडी, घोडाखडक, आदी वाड्यावर नियोजनबद्ध काम केल्याने येथे पाणी टंचाई जाणवत नाही.
सध्याची परिस्थिती लक्षात घेता वातावरणात भयानक उष्णता निर्माण झाली आहे, सुर्यनारायण कोपले असून तापमान ४०/४२ अंश च्या आसपास गेले आहेत, अनेक धरणातील पाणी साठा कमी झाला आहे. याचा परिणाम म्हणून अनेक नद्या, ओहळ, झरे कोरडे पडले आहेत, यामुळेच शहापूर तालुक्यात भयावह पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, झेडपी अध्यक्षा पुष्षाताई पाटील, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, सीईओ डॉ. भाऊसाहेब दांगडे आणि पाणी पुरवठा, कार्यकारी अभियंता, उप अभियंता आदी नी या भागाचा नुकताच पाहणी दौरा केला.
शहापूरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी २०२२/२३ मधील टंचाई आराखडा तयार करून त्यामध्ये सुमारे ६ कोटी ३० लाख ऐवढे मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये ९४ गावे ३५६ पाडे चा एकूण ४४५ गावात नवीन विंधन विहीर घेणे, नपापू योजना विशेष दुरुस्ती, टँकरने पाणी पुरवठा इत्यादी उपाययोजना चा समावेश करण्यात आला आहे. टँकरने पाणी पुरवठा करणे साठी ६४:४४ लाख, एप्रिल ते जून १२०:३८, योजना दुरुस्ती ३३९:०, नवीन विधंन विहीर, ७२:१०असे ६ कोटी ३० लाख, ९२ हजार इतकी रक्कम मंंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे ऐवढ्या खर्चानंतर तरी महिलांच्या डोक्यावरील हंडा हटणार का? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते किशोर पंडित यांनी उपस्थित केला आहे. तर शहापूरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी सर्वोतोपरी उपाययोजना व प्रयत्न सुरू आहेत असे शहापूर पंचायत समितीचे पाणी पुरवठा उप अभियंता विकास जाधव यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment