आम आदमी पार्टीतर्फे मुक मोर्चाचे आयोजन !! "कोरोना काळातील सर्व कामगारांना कामावर घेण्याची मागणी"
कल्याण, वैष्णवी माळी : कल्याण डोंबिवली मधील कोरोना योद्ध्यांना पुन्हा नोकरीवर घ्यावे आणि बंद पडलेल्या हॉस्पिटल मधील वार्ड उपचारासाठी चालू व्हावे ह्या विषयावर आम आदमी पार्टी तर्फे मूक मोर्चा काढण्यात आला. आम आदमी पार्टी कल्याण डोंबिवली तर्फे तोंडावर पट्टी लावून कल्याण पश्चिम मधील रुक्मिणी बाई हॉस्पिटल ते कल्याण डोंबिवली महानगरपालिका पर्यंत पदयात्रा करत आणि लोकांना कोविड योध्यावर झालेल्या अन्याय तसेच सरकारी हॉस्पिटलची झालेली दुर्दैवी अवस्थेची जनजागृती करण्यात आली.
१२ लाख लोकसंख्या असलेल्या ऐतिहासिक कल्याण-डोंबिवलीत शहरात सरकारी हॉस्पिटलमध्ये कोणत्याही मोठ्या आजाराचे उपचार होत नाही आणि अशावेळी पेशंटला मुंबई किंवा कळवा सारख्या हॉस्पिटल मध्ये हलविण्यात सांगितले जाते वेळेवर उपचार न मिळाल्याने त्या पेशंटला उपचारा अभावी जीव गमवावा लागतो, त्या वेळी पेशंटच्या नातेवाईकांचे खूप मोठे नुकसान होते.
आम आदमी पार्टीची मागणी होती की, कोरोना काळात ज्या कोरोना योद्धा नीं कार्य केले आहेत आणि प्रशासनाने त्यांना घरी बसवले आहे अशा सर्व कामगारांना परत स्वास्थ किंवा इतर विभागात कार्यरत करावे तसेच बंद पडलेल्या हॉस्पिटल मधील वार्ड, डिस्पेंसरी, मॅटर्निटी होम चालू करावे. याबाबत मूक मोर्चाचे आयोजन करत आम आदमी पार्टी ने सदर मागणी केली आहे. याप्रकरणी पालिकेला निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी ठाणे जिल्हा सचिव विनोद गुप्ता, डोंबिवली विधानसभा महिला समिती अध्यक्ष अक्षरा पटेल, सदस्य सुनिल वेंगुर्लेकर, सचिन श्रीराम जोशी व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते.
No comments:
Post a Comment