*शेतकरी/ कामगार भाई भाई* हमी भावाचे आंदोलनासाठी शेतकऱ्यांनी एक व्हावे ! किसान सभा जिल्हा अधिवेशनात आवाहन !!
चोपडा, बातमीदार... १९३६ साली अखिल भारतीय किसान सभेचे स्थापना करताना शेतीत जो राबतो त्याला जमीन द्या, जमीनदारी/ सावकारी पाशातून मधून शेतकरी मुक्त करा, ही हाक देऊन किसान सभेची स्थापना करण्यात आली त्या आंदोलनांनी जमीनदारी संपली.
किसान सभा सुरुवातीपासून शेतकरी श्रमिक कामगार यांची एकजुट व व दुसऱ्याच्या संघर्षाला हक्काचा लढाईला साथ देण्याचे बाजूची आहे. शेतकऱ्यांचे शोषण शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्चानुसार भाव मिळत नाही, त्यात मोदी सरकारचे धोरणही प्रतिकूल असून ते तीन शेतकरी विरोधी कायदे व त्यासाठी चाललेले आंदोलक शेतकऱ्याचे केलेले हाल, यथेच्च बदनामी बरोबर ७०४ शेतकऱ्यांना बलिदान पत्करावे लागले पण शेतकऱ्यांची एकजूट पुढे सरकार हरले हमी भावासाठी चे लढाईत शेतकरी यांनी गट तट धर्म जात भेद विसरून सहभागी व्हावे, असे आवाहन चोपडा येथे नगर वाचन मंदिरात आयोजित जळगाव जिल्हा किसान सभा अधिवेशनात वक्त्यांनी केले.
या अधिवेशनाचे अध्यक्ष स्थानी जळगाव जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कॉम्रेड शिवाजी दौलत पाटील अंमळनेर हे होते. उद्घाटन भाषण किसान सभेचे राज्य सचिव कॉम्रेड हिरालाल परदेशी (शिरपूर) यांनी केले. अधिवेशनाचे मुख्य निमंत्रक कामगार नेते कॉम्रेड अमृत महाजन व भाकपचे जिल्हा सचिव कॉ. लक्ष्मण शिंदे, अर्जुन कोळी यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन श्री रमेश पाटील, रुखन खेडा यांनी केले. अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष श्री हिम्मतराव महाजन एरंडोल हे होते, या वक्त्यां व्यतिरिक्त सर्वश्री उत्तम इंधा महाजन, दिलीप चौधरी यांनी देखील आपले विचार मांडले. शेतमालास योग्य भाव मिळाला तरच शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सुटतील असे ठासून सांगितले प्रा. आशिष जाधव यांनी शेतकरी आत्महत्या विषयावर विचार मांडले.
ठराव झाले ते असे.. १) केळीला बोर्ड प्रमाणे भाव मिळावा. २) कांदा उत्पादक बियाणे बाबतीत काही व्यापारी लुबाडतात बोगस बियाणे देतात या बियाणाची कसून चौकशी विक्री पूर्वी कृषी खात्याने करावी कांद्याला रास्त भाव द्यावा. ३) तेलंगणात रयतू बंधू किसान योजना, ओरिसात कालिया योजना व केरळमधील भाजीपाल्याला रास्त भाव देण्याची योजना याबाबत महाराष्ट्र सरकारने अभ्यास करावा व महाराष्ट्रात ह्या योजना लागू कराव्यात. ४) मार्केट कमिटी त शेतकऱ्यांना ताटकळत बसावे लागते व्यापारी पिके वाटून घेतात व मनमानी पद्धतीने भावाने खरेदी करतात ते बंद व्हावे. शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचे पिकांचे जंगली श्वापदे नुकसान करतात.. मुलाबाळांच्या तोंडचा घास हिरावून घेतात अशावेळी जिल्हा परिषद व आमदार यांनी शेतकऱ्यांना तार कंपाउंड साठी मदत करावी वनखात्याने नुकसान भरपाई देताना ऑनलाइन अर्जाचा घोळ घालू नये. असे ठराव करणेत आले.
कॉम्रेड शिवाजी पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की अलीकडे काही पिकांची जागतिक टंचाई मुळे कापूस, मका पिकांना बरा भाव मिळाला. परंतु केळी, ऊस, कांदा, भाजीपाला यांना कुठे भाव आहे? अशी पृच्छा केली.
या अधिवेशनाला जळगाव चोपडा धरणगाव यावल अमळनेर एरंडोल या सहा तालुक्यांची सर्वसमावेशक कार्यकारिणी निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी शिवाजीराव दौलत पाटील, कार्याध्यक्ष हिम्मतराव महाजन, उपाध्यक्ष उत्तम इंधा महाजन, सचिव दिलीप चौधरी, सहसचिव आशिष जाधव, खजिनदार.. देवीदास पाटील, सल्लागार कॉम्रेड अमृत महाजन, लक्ष्मण शिंदे, शांताराम पाटील, सदस्य सर्वश्री आसाराम सोनू कोळी, एकनाथ विष्णू महाजन, रमेश पाटील, विजय माळी, नरवाडे, चंद्रकांत माळी, दहिवद पुंडलिक, राजपूत भवाले, अनंत लोटन चौधरी, अकुल खेडे, वासुदेव कोळी, मोहिदे, सर्जेराव पाटील मंगरूळ अशा तऱ्हेने २१ जणांची कार्यकारिणी निवडण्यात आली यात चार जागा रिक्त आहेत. अधिवेशनादरम्यान शिरपूर येथे २८/ २९ मे रोजी आयोजित राज्य अधिवेशनात २८ मेला प्रचंड रॅली व जाहीर सभासाठी प्रचार हस्तपत्रकाचे प्रथम प्रसारण श्री उत्तम महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
अधिवेशनासाठी ४० प्रतिनिधी आले होते हे सर्व हे सर्व प्रतिनिधी शिरपूर येथे राज्य अधिवेशन रॅलीत सहभागी होणार, असा निर्णय घेण्यात आला, शिवाय २०० आदिवासी शेतकरी सहभागी होतील, असे जिल्हा किसान सभेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. अधिवेशनात उपस्थित प्रतिनिधींनी तीन हजार रुपये मदत ही जमा करून दिली. सर्वश्री दुधा जाधव संतोष कुंभार, तुळशीराम पाटील, सर्जेराव पाटील, अनंत लोटन चौधरी यांनी अधिवेशनासाठी मोलाचे सहकार्य केले.
No comments:
Post a Comment