Saturday, 14 May 2022

आर एस पी कमांडर व मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ग्रुपचे प्रमुख मनिलाल शिंपी यांची थोर समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट !!

आर एस पी कमांडर व मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ग्रुपचे प्रमुख मनिलाल शिंपी यांची थोर समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट !!


अहमदनगर, संदीप शेंडगे : मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ग्रुपचे प्रमुख व आर एस पी कमांडर श्री मनिलाल शिंपी यांनी ज्येष्ठ समाजसेवक लोकहितवादी भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे आदरणीय श्री अण्णा हजारे साहेबांची नगर जिल्ह्यातील पारनेर तालुज्यातील राळेगणसिद्धी येथे सदिच्छा भेट घेऊन मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ग्रुप ची माहिती दिली. 


पुढील उपक्रमांसाठी मार्गदर्शन आणि या ग्रुपची पुढील वाटचाल कशी राहील यासंबंधी चर्चा केली, ही सर्व माहिती ऐकून आणि कार्यक्रमाचे फोटो पाहून थोर समाज सुधारक, समाजसेवक सन्माननीय अण्णा हजारे यांना खूप आनंद झाला व त्यांनी अभिनंदन करून आजच्या काळात अशी सेवा करणे म्हणजे संत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांच्या कार्याची आठवण देणारे आहे. 


तसेच तुम्ही जे कार्य करीत आहात ते समाजाभिमुख असून या कार्यासाठी आमच्या प्रतिष्ठान कडून जे सहकार्य लागेल ते कधीही करायला तयार आहोत, तुमच्यासारख्या निस्वार्थी समाज सेवक देवदुतांची, महाराष्ट्रालाच नव्हे संपूर्ण देशाला आणि जगाला गरज आहे असे मनोगत व्यक्त केले. मानव सेवा या ग्रुपने केलेल्या कार्याला मनापासून कौतुक करत, अभिनंदन पर शुभेच्छा अण्णा हजारे यांनी दिल्या.

No comments:

Post a Comment

वी नीड यू सोसायटीचे २०२४चे शिक्षण, समाज व कार्यव्रती पुरस्कार जाहीर !!

वी नीड यू सोसायटीचे २०२४चे शिक्षण, समाज व कार्यव्रती पुरस्कार जाहीर !! ठाणे, प्रतिनिधी : वी नीड यू सोसायटी संस्थेतर्फे समाजात ‘व...