दापोली पोलीस स्टेशनला आग ! शॉकसर्कीटने आग लागल्याचा अंदाज !!
दापोली, आजाद श्रीवास्तव : दापोली पोलीस स्थानक इमारतीस आग लाग लागल्याची घटना घडली आहे. सकाळी ६ ते ६:३० वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.यासंदर्भातील माहिती त्वरित अग्निशामक दलाला देण्यात आली. त्यानंतर अग्निशामक दलाचे गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून दरम्यान आग आटोक्यात आणण्यासाठी दापोली पोलिस कर्मचारी, नागरिकांनी मदत कार्य केले. आगीमध्ये नेमकी किती व कोणत्या प्रकारची हानी झाली आहे हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे.
No comments:
Post a Comment