Monday, 9 May 2022

पालवणीत समाज मंदिराचे ऊद्घाटन ! समाजमंदीरासाठी जागा उपलब्ध करुन दिल्या बद्दल त्यांचे भाऊ श्री. अशोक जोगी व मुलगा श्री. संतोष जोगी यांचा सत्कार !!

पालवणीत समाज मंदिराचे ऊद्घाटन ! समाजमंदीरासाठी जागा उपलब्ध करुन दिल्या बद्दल त्यांचे भाऊ श्री.अशोक जोगी व मुलगा श्री. संतोष जोगी यांचा सत्कार !!


रत्नागिरी, गणेश नवगरे : नवनाथ प्रतिष्ठान पालवणी गोसाविवाडी येथे समाज मंदिर उद्घाटन व सालाबादप्रमाणे सत्यनारायणाच्या महापुजा आयोजित केली होती. या कार्यक्रमाची सुरूवात नवनाथ मंदिरात वर्धापन दिन म्हणुन नवनाथांची अभिषेक करुन पुजा आरती करुन सुरूवात झाली.


समाज मंदिराचे उद्घाटन मा. संतोषजी गोवळे (शिवसेना तालुका प्रमुख तथा जि.प.सदष्य) यांनी जेष्ट सल्लागार श्री. रघुनाथ पोस्टुरे, श्री.दशरथ साप्टे शिवसैनिक युवासैनिक, कार्यालय प्रमुख मा.श्री. सुधिर पगार, नाथपंथी गोसावी समाजाचे अध्यक्ष मा.श्री. अनंतजी मंडपे, उपाध्यक्ष मा.श्री रमेशजी राणे, समाजाचे सेक्रेटरी मा.श्री. अमितजी राणे यांच्या उपस्थितीत मोठ्या ऊत्साहाच्या वातावरणात रीबीन कापुन, नारळ वाढऊन समाजमंदिराचे लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी समाज मंदिराला नीधी मी उपलब्ध करुन दिला व आज माझ्याच हस्ते ऊद्घाटन होतोय याचा मला अभिमान आहेच त्याच बरोबर हा माझ्या अक्काचा गाव असल्याने मी सदैव कार्य तत्पर राहीन व जी काही तुमच्या गावाची विकास काम येतील ती माझ्या पर्यंत आली तर मी पुर्ण करुन देईन असे आश्वासन मा. संतोषजी गोवळे यांनी दिले.

नाथपंथी गोसावी समाजाचे उपाध्यक्ष यांनी या पालवणी गोसावि वाडीने आज पर्यंत समाजाला चांगले योगदान दिले. कै. गोविंद जोगी पासुन बाळु जोगी, अनंत नौगरे यांनी समाजाला एक चांगल्या प्रगतीपथावर नेऊन आज चांगला प्रेरणादायी समाज पहायला मिळतोय तो या तिघांमुळे त्यामुळे पालवणी गोसावि वाडीच्या कार्यक्रमाला आम्ही अवर्जुन ऊपस्तिथ रहातोच असे म्हणाले. यावेळीस कै. गणपत जोगी यांनी गोसावीवाडी गावाला ७/१२ उतारासह समाजमंदीरासाठी जागा उपलब्ध करुन दिल्या बद्दल त्यांचे भाऊ श्री.अशोक जोगी व मुलगा श्री.संतोष जोगी यांचा विषेश शाल व पुष्पगुच्छ देऊन शिवसेना मंडणगड तालुकाप्रमुख तथा मा.जि.प. सदष्य श्री संतोषजी गोवळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमा दरम्यान लहान मुलांचे खेळ, बॉक्स क्रिकेटचे सामने खेळवले गेले त्याला तरुणवर्गाने चांगला प्रतिसाद दिला. तसेच महिलावर्गाचा हळदी कुंकू व संगीत खुर्चिच्या स्पर्धांची नितीन नौगरेनी नियोजन बद्ध कार्यक्रमाची आखणी करुन पार पाडल्या.

या कार्यक्रमाल राष्ट्रवादिचे मंडणगड तालुका अध्यक्ष मुजफ्फर मुकादम, राकेश साळुखें व पंचायत सदष्य मा. प्रकाश सिगवण देखिल उपस्थित होते या वेळीस मुजाफ्फर मुकादम म्हणाले २०१८ राष्ट्रवादीचे आमदार संजयराव कदम यांच्या प्रयत्नात समाज कल्याण खाते व रत्नागिरी जिल्हापरीषद यांच्या माध्यमातुन या इमारतीला मान्यता मिळाली परंतु वाळु मिळत नसल्याने थोडा ऊशीर झाला पण व्यवस्तिथ बांधकाम झाले आहे. या पुढेही या गावाचे काम आमच्या पर्यंत आले तर आम्ही नक्किच पुर्ण करुन देऊ असे म्हणाले. या कार्यक्रमाला सभापती सौ.स्नेहलताई सपकाळ, सरपंच निलेश पवार, उपसरपंच सचिन गुजर, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सुरेशजी दळवी, उत्सव कमिटीचे अध्यक्ष, सुधिर पारदुले, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर पवार व पंचायत समितीचे सदस्य देखिल अवर्जुन उपस्तिथ होते.

No comments:

Post a Comment

आंगवली येथील श्री मार्लेश्वराचा १२ जानेवारीपासून यात्रोत्सवाला सुरुवात !

आंगवली येथील श्री मार्लेश्वराचा १२ जानेवारीपासून यात्रोत्सवाला सुरुवात ! ** श्री मार्लेश्वर देवस्थान रिलिजस अँण्ड चॅरिटेबल ट्रस्ट, आंगवलीतर्...