Monday, 9 May 2022

अंगणवाडी कर्मचारी यांच्या उन्हाळी सुट्टीमध्ये कपात ! 'महिला बालकल्याण खात्याचा आयुक्त रुबल अग्रवाल यांचा जाहीर निषेध त्यांच्या पत्राची होळी'

अंगणवाडी कर्मचारी यांच्या उन्हाळी सुट्टीमध्ये कपात ! 'महिला बालकल्याण खात्याचा आयुक्त रुबल अग्रवाल यांचा जाहीर निषेध त्यांच्या पत्राची होळी'


चोपडा, बातमीदार.. कोरोना काळापूर्वी दरवर्षी अंगणवाडी सेविकांना मे महिन्यात पंधरा दिवस सुट्ट्या देण्याच्या प्रघात होता. तो मोडीत काढण्याचा पराक्रम एकात्मिक बाल विकास प्रकल्प श्रीमती रुबल अग्रवाल यांनी केला, याबद्दल निषेध करून त्यांच्या सुटी कपातीचे पत्राची होळी 'महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक, जळगाव' जिल्हा शाखेने प्रकल्प कार्यालयासमोर केली. 


होळी करणे अगोदर, चोपडा एकदोन प्रकल्पाला कर्मचाऱ्यांचे सुट्टी बाबत निवेदन सादर करण्यात आले, या निवेदनाची प्रत चोपडा एक तर्फे आर आर पाटील, बडगे मॅडम, चोपडा दोन तर्फे निशा वाघ, श्रीमती शिरसाठ यांनी स्वीकारले. निवेदनात म्हटले आहे की, अंगणवाडी सेविकांना मदतनिसांना सालाबाद प्रमाणे पंधरा दिवस सुट्टी मिळावी व ती सवलत मिळावी तसेच कोरोना काळातील सुट्ट्यांचे रोखीकरण करून, अंगणवाडी सेविका मदतनीस यांना सुट्यांचा मोबदला देण्यात यावा. या मागण्यांचे निवेदन सादर करतेवेळी युनियनचे जिल्हाध्यक्ष अमृत महाजन, तालुका अध्यक्ष वत्सला पाटील, प्रतिभा पाटील तसेच सिंधुबाई पाटील, अलकाबाई पाटील, लताबाई पाटील, पंचशीला परदेशी बोरसे बाई, मीना पाटील, शोभाबाई सनेर या कार्यकर्त्या मदतनीस उपस्थित होत्या पत्रकात पुढे म्हटले आहे की
कोरोना काळात जीव धोक्यात घालून अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अंतर्गत सर्व कामे सांभाळून, कोरोनात काम देखील केली आहेत. 


यावर्षी कुठे त्यापासून मुक्ती मिळत आहे आणि अशावेळी एकात्मिक बालविकास प्रकल्प खात्याच्या आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल यांनी पंचवीस वर्षाची पंधरा दिवस उन्हाळी सुट्टी देण्याची परंपरा मोडून काढली जणू काही "*गर्मी मे भि लगे थंडी का ए हसास*" व फक्त सात दिवस सुट्ट्या जाहीर केले आहेत, यावर्षी विदर्भात खानदेशात ४६ डिग्री तापमान आहे पण त्यात मुलांना बोलवा असे सांगणे संयुक्तिक वाटत नाही एअर कंडीशन खाली उन्हाळा घालवनाऱ्या आयुक्तांना हे काय समजणार? उन्हाळ्यात वर्ग चालवणे म्हणजे बालकांना  उन्हाळातील आजार देण्याचे निमंत्रणच होय असे सांगून अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या पत्रकात म्हटले आहे, कागदोपत्री घोडे नाचणाऱ्या आयुक्त यांनी आमच्या मागणी लक्षच दिले नाही.. म्हणून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या सुट्टीत आठ दिवसाची कपात करणाऱ्या महिला बाल विकास आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या जाहीर निषेध करून त्यांचा अन्याय्य पत्रकाची होळी करण्यात आली, असा खुलासाही जळगाव जिल्हा अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनने सिद्ध केलेल्या पत्रकात करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

आंगवली येथील श्री मार्लेश्वराचा १२ जानेवारीपासून यात्रोत्सवाला सुरुवात !

आंगवली येथील श्री मार्लेश्वराचा १२ जानेवारीपासून यात्रोत्सवाला सुरुवात ! ** श्री मार्लेश्वर देवस्थान रिलिजस अँण्ड चॅरिटेबल ट्रस्ट, आंगवलीतर्...