Tuesday, 10 May 2022

कल्याण पंचायत समितीच्या दुरुस्ती वर काही महिन्यातच पुन्हा लाखोंचा खर्च, उप अभियंत्यांकडून समर्थन ?

कल्याण पंचायत समितीच्या दुरुस्ती वर काही महिन्यातच पुन्हा लाखोंचा खर्च, उप अभियंत्यांकडून समर्थन ?


कल्याण, (संजय कांबळे) : काही महिन्यापूर्वीच कल्याण पंचायत समितीच्या दुरुस्ती वर तब्बल ८६ लाखाच्या आसपास खर्च करण्यात आला असताना आता पुन्हा दुरुस्तीच्या नावाखाली लाखोंची उधळपट्टी करण्यात आली असून खरेच याची आवश्यकता होती का? की 'खिसे' भरण्यासाठी हे सर्व उद्योग सुरु आहेत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


कल्याण पंचायत समितीची इमारत धोकादायक ठरल्याने ती पाडण्यात आली, त्यामुळे संपूर्ण इमारतच पाडून ती नव्याने बांधावी असे काहींचे मत पडले तर वाढीव चटई क्षेत्र मिळत नसल्याने हा प्रश्न मंत्रालयात पेंडिंग असल्याने बचत भवन इमारतीचे स्ट्रक्चर, पिलेरवर प्रक्रिया करून ती दुरुस्त करावी असे अंतिम ठरल्याने अखेरीस या इमारतीची गळती थांबवून ही दुरुस्ती करण्यात आली, यासाठी तब्बल ८६ लाखाच्या आसपास खर्च केला गेला. यामध्ये बहुतांश किरकोळ छोट्या मोठ्या कामांचाही समावेश होता. तत्कालीन कल्याण पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे उप अभियंता एस आर चव्हाण यांच्या देखरेखीखाली हे काम करण्यात आले होते.


यावेळी इतक्या खर्चाविषयी तालुक्यात उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत असल्याने तत्कालीन माझी सभापती रंजना केतन देशमुख यांनी पंचायत समितीच्या बैठकीत इतका खर्च, कोठे कोठे व कशावर झाला, याची माहिती देण्याची मागणी केली होती. याला सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला होता. परंतु अद्याप ही माहिती सदस्यांना मिळाली नाही. असे असताना आता पुन्हा कल्याण पंचायत समितीच्या किरकोळ दुरुस्ती वर अडिज ते तीन लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. यामध्ये गटविकास अधिकारी यांचा दरवाजा, सभापती कार्यालय दरवाजा, व इमारतीच्या पहिल्या माळ्यावर भिंतीवर लाद्या व रंगरंगोटी यावर केला असल्याचे बांधकाम विभागाचे उप अभियंता संदिप महाडिक यांनी  बिनधास्त सांगितले.

बर ऐवढे करून ही इमारतीच्या कोपऱ्यात अस्वच्छता, गुटखा, पानाचे नकाशे, दारुच्या रिकाम्या बाटल्या, पिण्याच्या पाण्याचा अभाव, कोरडा कुलर, आदी गैरसोयी आहेतच.

वास्तविक पाहता पावसाळा तोंडावर आला आहे, अनेक गावाची पावसाळ्या पुर्वीची कामे उदा. नालेसफाई, कचरा व्यवस्थापन, गटारे बांधकाम, सांडपाणी वाहून नेण्यासाठी उपाययोजना, पाणी पुरवठा, आरोग्य, अंगणवाडी बांधकाम, शाळा दुरुस्ती, वर्ग खोली दुरुस्ती, आदी कामे झालेली नाहीत, बरीच काम निधी अभावी रखडलेली असताना बांधकाम विभाग मात्र किरकोळ दुरुस्तीच्या नावाखाली स्वतःची दुरुस्ती करण्यात धन्यता मानत आहेत. या विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कार्यालयात कधी येतात, साईटवर कधी जातात, आणि पार्ट्या कोठे झोडतात हे नागरिकांना माहिती नाही असे मुळीच नाही. जनता महागाईने त्रस्त आहे, भ्रष्टाचार मात्र स्वस्त आहे. दरवर्षी ची किरकोळ दुरुस्ती मस्त आहे, हे थाबांयला हवे असे वाटत असेल तर प्रत्येक नागरिकांनी दक्ष, जागृत होऊन यांना जाब विचारला पाहिजे.

प्रतिक्रिया :-

*या संदर्भात पुर्ण माहिती घेऊन दोषींवर कारवाई करण्यात येईल- एस आर चव्हाण, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद. ठाणे.

*हा खर्च करणे मला गरजेचं वाटलं म्हणून तो केला आहे- संदिप महाडिक -उप अभियंता, बांधकाम विभाग, कल्याण पंस.

*दरवर्षी लाखोची दुरुस्तीची काम केली जातात, अखेर ही दुरुस्ती कधी थांबणार की चालूच राहणार- कैलास गायकर (सा. कार्यकर्ते, कल्याण)

No comments:

Post a Comment

धम्माल विनोदी नाटक "वरचा मजला रिकामा" रंगमंचावर ...

धम्माल विनोदी नाटक "वरचा मजला रिकामा" रंगमंचावर ... ** १२ जानेवारी २०२५ रोजी रात्रौ.ठिक ७:३० वाजता साहित्य संघ नाट्यगृह चर्नीरोड य...