Friday, 6 May 2022

मातृदिन - संत राजिंदर सिंह जी महाराज

मातृदिन
- संत राजिंदर सिंह जी महाराज


मदर्स डे हा दिवस जगभरात मातेंचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. आई आणि मुलाचे नाते हेच केवळ एकमेव असे प्रेम आहे जे पवित्र व निस्वार्थ आहे. 

आपण आपल्या जीवनातील उदाहरण घेतले असता आपल्याला कळून येते की संसारिक प्रेमाचा सर्वोच्च आणि सर्वोत्तम आदर्श म्हणजे आई आणि मुलाचे प्रेम आहे. आपण बघतो की अगदी लहान मूल कसे आपल्या आईचे केस ओढते किंव्हा तिच्या  गालावर चापट्या मारते, तरीही त्याच्या अश्या कृतीचा आईला राग येत नाही. मुल शी ने भरून जरी आईकडे आले तरी ती मुलाला मिठी मारते. आईचे मुलाप्रतीचे प्रेम म्हणजे एका हृदया पासून दुसऱ्या हृदया पर्यन्त पोहचणारा मार्ग होय. आई आणि मुलाच्या नात्यामध्ये लोभाला कोणतेही स्थान नाही. आई आपल्या मुलासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करीत असते. स्वतः च्या घासातील घास काढून ती आपल्या बाळा ला भरविते. 

त्याचप्रमाणे, बाळा ला उब मिळावी म्हणून ती स्वतःचे वस्त्र त्याच्या भोवती लपेटते. आपल्या मुलासाठी करत असलेल्या तिच्या त्यागाला आणि बलिदानाला अंत नाही. ह्या पवित्र नात्यात, आई मुलाच्या प्रेमाशिवाय, या जगातील इतर नाते संबंधातील प्रेम सोडून देते. जेव्हा मुल तिच्या कुशीत असते तेव्हा ती सर्वकाही विसरुन जाते व केवळ आपल्या मुलाच्या प्रेमात मग्न रहाते. या नात्यात आई आपला अहंकार सोडून देते. त्याचप्रमाणे, आई आपल्या मुलाच्या इच्छेसमोर स्वत:च्या इच्छा देखील सोडून देते आणि नि:स्वार्थपणे त्याची सेवा करते.
आपल्याला माहित आहे की आईचे तिच्या मुलावर असलेले प्रेम हे नाजूक व हृदयस्पर्शी असते. हे ऐहिक प्रेमाचे शुद्ध रूप आहे जे  स्वार्थापासून पूर्णपणे मुक्त आहे. यासह मुलांनी देखील हे जाणून व समजून घ्याला हवं की त्यांची आई कश्या प्रकारे त्यांची सेवा करते आणि त्यांच्या सोयीसाठी व आरामा साठी किती त्याग करते .
जेव्हा आपण मोठे होतो तेव्हा आपल्या आईसाठी आपण काय करावे हे आपण सुनिश्चित केले पाहिजे. आईला आदरपूर्वक प्रेम करून आपण हे करू शकतो. आपल्यासाठी तिने केलेल्या कृतिचा व प्रयत्नांचा अन्तःकरणा पासून स्वीकार करायला हवा. 

अश्याच प्रकारे असे म्हटले जाते की परमेश्वराचे आपल्या शिष्यावरचे प्रेम हे हजारो मातांच्या प्रेमापेक्षा ही मोठे असते. सर्वशक्तिमान पिता - परमेश्वर आपल्या सर्वांवर खूप प्रेम करतात. संत सदगुरू आपल्याकडून  कोणत्याही प्रकारची अपेक्षा करत नाही, ते तर केवळ आपल्याला देण्यासाठीच येतात. ते नेहमीच आपल्याला अंतःकरणात जाऊन परमातम्या सोबत एकरूप  होण्यासाठी प्रेरित करतात. 

आपण मदर्स डे वर अर्थात मातृदिनी वचन देवू या, प्रतिज्ञा  करूया की आईच्या निस्वार्थ प्रेमाचे स्मरण फक्त मातृदिनी न ठेवता, आपल्या ऱ्हुदयात त्या प्रेमाला सदैव सजवून ठेवूया, त्याची कदर करू या. पिता परमेश्वरा चे देखील आपण आभार मानू या, की त्यांनी आपल्याला मानवी जीवनाची एक सुवर्ण संधी दिली आहे. त्यांच्या अगणित आशीर्वादांसाठी आणि अनंत प्रेमा प्रति आभार मानण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपण आपले जीवन प्रेमाने, सदाचाराने जगावे, ध्यानधारणेला वेळ देऊन, अध्यात्मिक मार्गावर वेगाने प्रगती करावी.

सावन कृपाल रुहानी मिशन, सावन आश्रम, संत कृपाल सिंह जी महाराज चौक, खेमानी रोड, उल्हासनगर- 2

अमृता : +91 84510 93275


No comments:

Post a Comment

नालासोपारात शिवसेनेत महिलांचे जोरदार इनकमिंग..!

नालासोपारात शिवसेनेत महिलांचे जोरदार इनकमिंग..! नालासोपारा, प्रतिनिधी : शिवसेना मुख्य नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी श...