ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार प्रश्नांवर ना. मुश्रीफ यांनी दिलेल्या आश्वासन नुसार मीटिंग घ्यावी !! "अन्यथा.. कर्मचारी बैठकीत आंदोलनाचा इशारा"
चोपडा, बातमीदार.. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी गेल्या जानेवारी २०२२ महिन्यापासून चालवलेला आहे, १ ते ८ जानेवारी काळात तर कोल्हापूर येथे ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कार्यालयासमोर आठ दिवस धरणे दिले. त्यावेळी आंदोलनाच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांनी आश्वासन दिले की महासंघाच्या मीटिंगमध्ये कर्मचार्यांच्या वेतन वाढ व इतर प्रश्नांवर चर्चा करू त्याप्रमाणे २७ जानेवारी २२ रोजी मंत्रालयात आभासी मीटिंगमध्ये बोलणीही केली.
परंतु प्रत्यक्ष फिजिकल मीटिंग होईल यावेळी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजुरीचे अनुमोदन होईल सांगून वेळ मारून नेली. म्हणून महासंघाने पुन्हा ५ एप्रिल २०२२ पासून कोल्हापूर मध्ये महामोर्चा नेण्याचा इशारा दिला याही वेळेस नामदार मुश्रीफ साहेबांनी लेखी लिहून दिले की, उपसचिव यांनी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मीटिंग ठेवावी त्यानुसार नामदार मंत्री महोदयांच्या लेखीनुसार कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नी निर्णायक बैठक न ठेवल्यास चोपडा तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी आंदोलनात मागे राहणार नाहीत, आंदोलन कोल्हापूरला ठरो की मुंबईला असा इशारा देणारे पत्रक ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे राज्य सहसचिव अमृत महाजन यांनी चोपडा पंचायत समिती मध्ये तालुका अध्यक्ष श्री रमेश पाटील यांचे अध्यक्षतेखाली घेतलेल्या बैठकीनंतर काढले आहे व गट विकास अधिकारी चोपडा यांचे मार्फत तसे निवेदन महाराष्ट्र शासनाला देण्यात आले आहे.
या निवेदनात नरवाडे सुटकार, नागलवाडी, मामलदा, गरताड या गावातील कर्मचाऱ्यांच्या स्थानिक मागण्याही सादर करण्यात आला त्यावेळी घेण्यात आलेल्या बैठकीला सर्वश्री प्रवीण कोळी, प्रकाश सपकाळे, महेंद्र धनगर, प्रकाश पाटील, राजेंद्र पाटील, आत्माराम पाटील, मुकेश पावरा, ईश्वर रमेश पाटील, नितीन सोनार, अमोल महाजन, पाटील, सुभाष कोळी, शांताराम पाटील, सुपडू शिंदे, अशोक गायकवाड, अरुण पाटील, श्री. आखाडे, अरुण पाटील आदी कर्मचाऱ्यांचा सहभाग होता
No comments:
Post a Comment