Thursday, 5 May 2022

महिलेच्या लौंगिक अत्याचार प्रकरणात भाजप आमदार गणेश नाईक यांना मुंबई हाय कोर्टात जामीन मंजूर !!

महिलेच्या लौंगिक अत्याचार प्रकरणात भाजप आमदार गणेश नाईक यांना मुंबई हाय कोर्टात जामीन मंजूर !!


भिवंडी, दिं,५, अरुण पाटील (कोपर) :
           भाजपचे आमदार गणेश नाईक यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटक पूर्व जामीन मंजूर केला आहे. एका महिलेकडून नाईकांविरोधात लैंगिक अत्याचार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. गणेश नाईक यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. कारण ठाणे सत्र न्यायालयाने नाईकांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावल्याने. गणेश नाईक हे फरार झाले  होते, मात्र  त्यांनी जामीन मिळावा या साठी अर्ज केला असता त्यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
            लिव्ह इन रिलेशन शिपमध्ये गेली 27 वर्ष एका महिले सोबत राहत तिच्यावर अत्याचार केल्याचा आणि तिला धमकावल्याचा आरोप गणेश नाईक यांच्यावर त्या महिलेने केला होता. या आरोपांची पोलिसां आधी महिला आयोगाने दखल घेतली होती. आणि पोलिसांनी गुन्हा दाखल करून घ्यावा असे म्हटले होते.
            गणेश नाईकांवर नवी मुंबईतल्या दोन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. याप्रकरणी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी आमदार नाईक यांच्या कडून अर्ज करण्यात आला होता. हा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आमदार नाईक यांनी हाय कोर्टात धाव घेतली आणि अखेर हायकोर्टाने आमदार गणेश नाईक यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. नाईक यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करणाऱ्या दीपा चव्हाण यांनी आपल्या जीविताला धोका असल्याचेही म्हटलंय.
            गेली अनेक दिवस नॉटरिचेबल असलेले आमदार नाईक हे आता उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर आता रिचेबल होणार का असा सवाल अनेकांना पडला आहे. हायकोर्टाने दिलासा दिल्यानंतर नाईक त्यांच्यावरील आरोपावर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

निळजे गाव येथे आई एकवीरा देवी पदयात्रा पालखी सोहळा मोठया भक्तिमय वातावरणात संपन्न ! ** ह. भ. प. श्री जितेन्द्र महाराज पाटील यांच्या कीर्तनान...