Thursday, 5 May 2022

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली समर्पित मागासवर्गीय आयोगाची भेट !! *शक्य तितक्या लवकर इम्पिरिकल डाटा देण्याची मंत्री छगन भुजबळ यांनी केली मागणी...*

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली समर्पित मागासवर्गीय आयोगाची भेट !!

*शक्य तितक्या लवकर इम्पिरिकल डाटा देण्याची मंत्री छगन भुजबळ यांनी केली मागणी...*


मुंबई, आजाद श्रीवास्तव, दि. ५ मे - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने समर्पित मागासवर्गीय आयोगाची भेट घेतली.


शक्य तितक्या लवकर इम्पिरिकल डाटा देण्याची मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी करतानाच यासाठी राज्यसरकार संपूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले.


यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्यायमंत्री मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे आदी उपस्थित होते. याशिवाय समर्पित ओबीसी आयोगाचे अध्यक्ष आणि माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया, आयोगाचे सदस्य एच. बी.पटेल, पंकज कुमार, महेश झगडे, नरेश गीते, शैलेशकुमार दरोकर आदीही उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

श्री पाणबुडी देवी कलामंच ( मुंबई ) प्रस्तुत व शिवप्रेमी महालक्ष्मी गावडेवाडी मंडळ ( कळंबट ) आयोजित नमन प्रयोगाचे आयोजन !

श्री पाणबुडी देवी कलामंच ( मुंबई ) प्रस्तुत व शिवप्रेमी महालक्ष्मी गावडेवाडी मंडळ ( कळंबट ) आयोजित नमन प्रयोगाचे आयोजन ! कोकण सुपुत्र लाडका ...