मा.उद्धव ठाकरे यांनी काढले स्व.आनंद दिघे यांच्या विषयी गौरवोद्गार !!
भिवंडी, दिं,८, अरुण पाटील (कोपर) :
आनंद दिघे हे 'झुकेंगा नही साला' असेच होते, हिंम्मत असेल तर समोर या. हिंमत असेल तर टक्कर द्या. असेच होते. बाळासाहेबांच्या तालमीत वाढलेले आनंद दिघे होते, त्यांच्या सारखा माणूस आणि शिवसैनिक पुन्हा होणे नाही, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्व.आनंद दिघे यांच्या विषयी गौरवउद,गार काढले.
स्व. शिवसेना नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारीत 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या सिनेमाचा ट्रेलर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लाँच झाला. या सोहळ्याला बॉलिवूड सूपरस्टार अभिनेता सलमान खान देखील हजर होता. यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरेंनी स्व.आनंद दिघे यांच्या विषयी गौरवोद्गार काढले.
काही काही क्षण असे असतात शब्द सुचत नाही. त्या काळामध्ये आपण जातो आणि शब्द सुचत नाही, असं आता माझं झालं आहे. सिनेमाचा ट्रेलर पाहिला तेव्हा शिवसेना म्हणजे काय आहे, शिवसैनिक म्हणजे काय आहे, नुसता एक कार्यकर्ता नाही तर गुरू आणि शिस्य असं हे नातं जपणार हा एकमेव पक्ष असणार आहे.आणि ही भावना असल्यामुळे अनेकांनी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांना त्यांना संपवून शिवसैनिक पुढे गेली' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांना टोला लगावला.
No comments:
Post a Comment