Friday, 11 July 2025

विवा ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टच्या उत्कर्ष परिवारातर्फे गुणवंतांचा गौरव सोहळा !!

विवा ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टच्या उत्कर्ष परिवारातर्फे गुणवंतांचा गौरव सोहळा !!

विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण

विरारच्या विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टच्या उत्कर्ष परिवारातर्फे नुकताच 10 जुलै 2025 रोजी शाळेचा स्थापना दिन व गुरुपौर्णिमा अशा दुहेरी औचित्याने वसई तालुक्यातील शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. गेली 35 वर्षे यशस्वी घोडदौड करणाऱ्या कै. पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष विद्यालयात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात जेईई अँडव्हान्स परीक्षेत ऑल इंडिया 135 वा रँक  आणि जेईई मेनमध्ये 99.89 टक्के गुण मिळविलेली कुमारी गंधा वर्तक हिचा सन्मान करण्यात आला. छत्रपती पुरस्कार विजेती खेळाडू रुचिता विनेरकर, राष्ट्रीय लांब उडी स्पर्धेत सहभागी जोबियन जॉन्सन फर्नांडिस, राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सहभागी यश जाधव, राज्य कबड्डी संघाची संघनायक देविका जाधव, 19 वर्षाखालील क्रिकेट संघाचा संघनायक आयुष वर्तक यांचाही गौरव करण्यात आला.

गुणवंतांमध्ये बारावी परीक्षेत निधी पाटील (कला शाखा), इशिका इंगळे (वाणिज्य शाखा), सिमरन चव्हाण (विज्ञान शाखा) यांनी कै. पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम क्रमांक मिळवला. तसेच दहावी परीक्षेत आर्या राऊत हिने सर्व विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेश्मा जोशी आणि वैशाली राऊत यांनी केले. मनोगत प्राचार्य मुग्धा लेले यांनी व्यक्त केले. आभार प्रदर्शन शाळेच्या इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक संतोष तिवारी यांनी केले. या वेळी संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्या धन्वी किरण सोलंकी आणि समन्वयक कल्पना राऊत यांची उपस्थिती लाभली. उत्कर्ष परिवारातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाला ट्रस्टचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, सचिव अपर्णा ठाकूर, व्यवस्थापन समितीचे सदस्य संजीव पाटील, संजय पिंगुळकर, एस.एन पाध्ये, समन्वयक नारायण कुट्टी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment

ठाण्यात ‘नवदुर्गा वेलनेस सायकल राईड’ला उत्स्फूर्त प्रतिसाद ! ठाणे, प्रतिनिधी : महिलांच्या आरोग्य आणि फिटनेसला प्रोत्साहन देण्यास...