संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (पश्चिम), मुंबई - ७० येथे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. विश्वनाथ राऊत सर होते.
यासोबतच गेल्या पंधरा वर्षांपासून रात्र शाळेला सातत्याने मदत ‘मासूम’ संस्थेची होत असते. मासूम संस्थेच्या प्रोजेक्ट मॅनेजर निकिता पोल मॅडम या उपस्थित होत्या. या संस्थेच्या योगदानाबद्दल त्यांचाही शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन शाळेचे वरिष्ठ शिक्षक श्री. समाधान खैरनार यांनी केले. मासूम संस्थेमार्फत नियुक्त शिक्षक श्री. योगेश वीरकर व श्री. मज्जिद शिकलगार सर यांनी कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन अचूकपणे पार पाडले.
श्री. नारायण चव्हाण यांनी सांगितले की, “सांताक्रुज बस डेपोजवळील आमच्या हनुमान मंदिरातील भक्तांकडून मिळालेल्या देणग्यांमधून आम्ही शैक्षणिक साहित्याच्या स्वरूपात गरजू विद्यार्थ्यांना मदत करतो. या उपक्रमासाठी रात्र शाळेचे माजी विद्यार्थी श्री. रुपेश गरड यांचे मोलाचे योगदान आहे.” त्यांनी शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करून भविष्यातही मदत सुरूच राहील, असे आश्वासन दिले.
श्री. साईनाथ दादा यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले, “प्रत्येक विद्यार्थी शिकून मोठा व्हावा, आपल्या शाळेचे नाव उज्वल करावे, हेच आमचे उद्दिष्ट आहे.” सीमाताई या शाळेच्या माजी विद्यार्थिनी असून, गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंना नमन करत सत्कार स्वीकारण्यात त्यांना विशेष आनंद झाला.
कार्यक्रमाची सांगता समाधान खैरनार सरांनी केलेल्या आभारप्रदर्शनाने झाली. उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक, विद्यार्थ्यांनी या प्रेरणादायी कार्यक्रमाचा आनंद घेतला.
No comments:
Post a Comment