Saturday, 28 May 2022

महाराष्ट्रातील १० विधान परिषदेच्या जागांसाठी २० जूनला निवडणूक !

महाराष्ट्रातील १० विधान परिषदेच्या जागांसाठी २० जूनला निवडणूक !


नवी दिल्ली, बातमीदार : महाराष्ट्रातून विधानपरिषदेवर रिक्त होत असलेल्या १० जागांसाठी २० जून रोजी निवडणूक होणार असून, अर्ज भरण्याचा अंत‍िम दिनांक ९ जून आहे. 

महाराष्ट्रसह उत्तर प्रदेश आणि बिहार विधान परिषदेतून ०६.०७.२०२२ ते २१.०७.२०२२ या कालावधी  दरम्यान निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या जागा भरण्यासाठी विधानपरिषदांच्या व्दैवार्षिक निवडणूक कार्यक्रम, निवडणूक आयोगाकडून बुधवारी रात्री जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विधानपरिषदेचे १० सदस्य तसेच  उत्तर प्रदेश, आणि बिहार विधानपरिषदांच्या एकूण २० सदस्यांचा कार्यकाळ संपुष्‍टात येत आहे. या रिक्त होणा-या जागांसाठी येणा-या‍ १० जून रोजी निवडणूक होणार आहे. 

महाराष्ट्रातून सदाशिव खोत, सुजितसिंग ठाकूर, प्रवीण दरेकर, सुभाष देसाई, रामराजे प्रतापसिंह नाईक-निंबाळकर, संजय दौंड, विनायक मेटे, प्रसाद लाड, दिवाकर रावते या विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ येत्या ०७ जुलै रोजी संपुष्टात येणार आहे तर, रामनिवास सिंह यांचा कार्यकाळ ०२ जानेवारी २०२२ रोजी संपूष्टात आलेला आहे. सदरील जागांसाठी विधानसभेच्या सदस्यांकडून विधानपरिषदेवर निवड केली जाणार आहे.

निवडणूक कार्यक्रम : 

विधानपरिषदेच्या या निवडणुकीसाठी आयोगाकडून अधिसूचना दि. ०२ जून २०२२ रोजी जाहीर करण्‍यात येणार आहे. तसेच निवडणूक अर्ज भरण्‍याची अंतिम तारीख ०९ जून २०२२ पर्यंतची आहे. अर्जांची छाननी १० जून २०२२ रोजी होणार असून, १३ जून २०२२ पर्यंत अर्ज मागे घेता येतील. मतदान २० जून २०२२ रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत होणाार असून, त्याचदिवशी सायंकाळी ५.०० वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. 

संबंधित राज्यांच्या मुख्‍य सचिवांनी या निवडणुकीचा कार्यक्रम पार पाडण्‍यासाठी संबंधित अधिका-यांना  सर्व आवश्‍यक त्या उपाय योजना करण्‍याविषयी निर्देश आयोगाकडून दिले गेलेले आहेत. निवडणुका आयोजित करताना कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सध्याच्या सूचनांचे पालन केले जात आहे किंवा कसे़ याची खात्री करण्यासाठी संबंधित मुख्य सचिवांना राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment

गेल ओम्वेट आणि भारत पाटणकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित माहितीपट 14 डिसेंबरला कोल्हापूरमध्ये प्रदर्शित !!

गेल ओम्वेट आणि भारत पाटणकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित माहितीपट 14 डिसेंबरला कोल्हापूरमध्ये प्रदर्शित !! ** Gail & Bharat (2025) दिग्दर...