Saturday, 28 May 2022

रेल्वे प्रशासनासोबत कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची विविध मागण्यांसाठी बैठक !

रेल्वे प्रशासनासोबत कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची विविध मागण्यांसाठी बैठक !


कल्याण, बातमीदार : कल्याण कसारा कर्जत (के३) रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे कल्याण ते कसारा व कल्याण ते कर्जत या मार्गावर प्रवाशांना भेडसाविणा-या समस्या रेल्वे प्रशासनाच्या कानावर घालण्यासाठी आणि त्याची सोडवणूक करण्यासाठी प्रवासी संघटना आणि रेल्वे प्रशासन यांच्यात दीर्घ बैठक झाल्याची माहिती रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी दिली.

संघटनेतर्फे वेळवेळी मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक व विविध विभागातील संबधित वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत पञव्यवहार आणि दुरध्वनीवरून संघटनेतर्फे पाठपुरावा करण्यात आला. तसेच नुकतेच टिटवाळा रेल्वे स्थानकातून सकाळी ८.३३ ची नियमित लोकल एसी लोकल केल्यानंतर स्थानिक प्रवाशांचा आक्रोशाबाबतही डीएमआर शलभ गोयल यांना माहिती देण्यात आली.

या संदर्भात एक बैठक बुधवारी सायंकाळी ५ वा झाली. या बैठकीला के३ रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे अध्यक्ष- राजेश घनघाव, सरचिटणीस- श्याम उबाळे, विभागिय उपाध्यक्ष विजय देशेकर, प्रमुख सल्लागार चंद्रकांत जाधव आणि वासिंद रेल्वे स्थानक प्रतिनिधी सचिन जाधव उपस्थित होते. तर रेल्वे प्रशासनातर्फे डीआरएम शलभ गोयल, सिनियर डीसीएम श्री वंजारी सिनियर डीओएम, आरपीएफ आयुक्त श्रीवास्तव आणि डीआरएम यांचे स्वीय सहाय्यक उपस्थितीत होते.

यावेळेस कल्याण- कसारा- कर्जत मार्गावरील प्रत्येक समस्येबाबत रेल्वे अधिकाऱ्यांना अवगत करण्यात आले, यावर रेल्वे अधिकाऱ्यांनी जी कामे सुरू आहेत त्या बद्दल सांगितले तर ज्या ठिकाणी स्थानिक अडचणींबाबत चर्चा केली व बाकी समस्यांवर लवकरच मार्ग काढला जाईल असे आश्वासन दिले.


No comments:

Post a Comment

६३ वा नागरी संरक्षण व होमगार्ड्स संयुक्त वर्धापन दिन (सप्ताह) सांगता समारोप एचिव्हर्स कॉलेज, कल्याण येथे उत्साहात !!!

६३ वा नागरी संरक्षण व होमगार्ड्स संयुक्त वर्धापन दिन (सप्ताह) सांगता समारोप एचिव्हर्स कॉलेज, कल्याण येथे उत्साहात !!! कल्याण प्र...