Saturday, 28 May 2022

जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिकेत तंबाखूजन्य पदार्थाची भव्य पोस्टर्स प्रदर्शनी व व्यसनमुक्ती संकल्पाचे आयोजन !!

जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिकेत तंबाखूजन्य पदार्थाची भव्य पोस्टर्स प्रदर्शनी व व्यसनमुक्ती संकल्पाचे आयोजन !!


मुंबई, (शांताराम गुडेकर) :

              सोमवार, ३० मे २०२२ रोजी उपहार गृह, तळमजला, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे पोस्टर्स प्रदर्शनी - सकाळी ११.०० ते सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत आयोजित केले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त, अधिकारी यांच्या हस्ते  व्यसनमुक्ती संकल्प - दुपारी ०३.०० वाजता होणार आहे. "जागतिक तंबाखू विरोधी दिन" निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य समिती, कामगार विभाग व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रचार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यांत प्रामुख्याने "तंबाखूजन्य पदार्थ व विक्री कायदा २००३" च्या अंमलबजावणीसाठी जनतेमध्ये प्रचार-प्रसार व्हावा याकरिता तंबाखूचा राक्षस, तंबाखूजन्य कायद्याची माहिती दर्शवणारे लक्षवेधक कट‌आऊट व पोस्टर्स व प्रचार पत्रकांच्या माध्यमातून प्रचार, प्रसार" करण्यात येणार असून उपस्थित महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी, मुंबईकर यांना आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, सहाय्यक आयुक्त यांच्या हस्ते तंबाखूमुक्तीची शपथ ही देण्यात येणार आहे अशी माहिती नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment

६३ वा नागरी संरक्षण व होमगार्ड्स संयुक्त वर्धापन दिन (सप्ताह) सांगता समारोप एचिव्हर्स कॉलेज, कल्याण येथे उत्साहात !!!

६३ वा नागरी संरक्षण व होमगार्ड्स संयुक्त वर्धापन दिन (सप्ताह) सांगता समारोप एचिव्हर्स कॉलेज, कल्याण येथे उत्साहात !!! कल्याण प्र...