Saturday, 28 May 2022

सावन कृपाल रुहानी मिशन च्या उल्हासनगर शाखे द्वारा ३० मे, २०२२ रोजी जनतेच्या सेवेसाठी थंड आणि गोड सरबता चे वितरण !!

सावन कृपाल रुहानी मिशन च्या उल्हासनगर शाखे द्वारा ३० मे, २०२२ रोजी जनतेच्या सेवेसाठी थंड आणि गोड सरबता चे वितरण !!


सावन कृपाल रुहानी मिशन च्या उल्हासनगर शाखे कडून ३० मे, २०२२ रोजी दयाळ पुरुष संत दर्शन सिंह जी महाराज यांच्या ३३ व्या पुण्यतिथी भंडाऱ्या प्रसंगी गर्मीच्या या तापलेल्या उन्हात मिशनच्या सेवादारां कडून

1) कॅनरा बैंक, मैन रोड, उल्हासनगर -4
2) सेक्शन -17, उल्हासनगर -3
3) सावन कृपाल रूहानी मिशन,

खेमानी रोड, उल्हासनगर -2 लोकांच्या सेवेसाठी थंड आणि गोड सरबताचे वितरण केले जाईल.

संत दर्शन सिंह जी महाराज यांनी आपले गुरु हुजूर बाबा सावन सिंह जी महाराज व परम संत कृपाल सिंह जी महाराज यांच्या नावे सन १९७४ मध्ये 'सावन कृपाल रुहानी मिशन' ची स्थापना केली. ते त्यांच्या काळातील महान सूफी संत-शायर म्हणून ओळखले जात. १९८९ मध्ये त्यांना उर्दू अकादमी, दिल्ली, पंजाब व उत्तर प्रदेश द्वारा सन्मानित केले गेले. त्यांनी अध्यात्माला 'सकारात्मक अध्यतमाच्या रूपात सादर केले. त्यांच्या मते पिता-परमेश्वराला प्राप्त करणे केवळ ऋषी-मुनीं करताच सीमित नसून, प्रत्येक माणसाचा हा जन्म-सिद्ध अधिकार आहे. आपल्या पैकी प्रत्येक व्यक्ती याचा अनुभव ध्यान-अभ्यास द्वारे करू शकतो.

संत दर्शन सिह जी महाराज महासमाधी मध्ये लीन झाल्या नंतर, त्यांच्या पश्चात या अध्यात्मिक कार्याचा कार्यभार संत राजिंदर सिंह जी महाराज यांनी सांभाळला आणि त्यांच्या द्वारे  दिल्या गेलेल्या संत-मत शिकवणुकीचा संपूर्ण विश्वभरात प्रसार ते करीत आहेत.

सावन कृपाल रुहानी मिशन तर्फे मानव कल्याणा करिता अनेक प्रकारची कार्य केली जातात. वेळोवेळी रक्तदान शिबीरा बरोबर, विनामूल्य मोती बिंदू चे ऑपेरेशन शिबीर व स्वास्थ्य चिकित्सा शिबीराचे सुद्धा आयोजन केले जाते. तसेच शारीरिक दृष्ट्या विकलांग असलेल्या बंधू-भगिनींच्या सहायतार्थ उपकरणे सुद्धा वितरित केली जातात. या व्यतिरिक्त गरीब आणि अनाथ मुलांसाठी संत राजिंदर सिंह वोकेशनल ट्रैनिंग सेन्टर मध्ये मुलांना आत्मनिर्भर बनविण्याकरिता अनेक प्रकारचे कोर्स विंनामूल्य ठेवले जातात. वृद्ध लोकांकरिता सुद्धा वेळो वेळी अनेक प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

याच बरोबर नैसर्गिक आपत्तीत जसे कि तामिळनाडू मध्ये आलेली त्सुनामी, उत्तर उत्तराखंड मध्ये आलेली नैसर्गिक विपत्ती, जम्मू-काश्मीर मध्ये आलेला महापूर आणि नेपाळ मध्ये झालेल्या भीषण भूकंपात सुद्धा मिशनच्या सेवादारांकडून पीडितांसाठी दैनंदिन जीवनात लागणाऱ्या आवश्यक वस्तूं बरोबर वूलन चे कपडे, कांबळ, स्वेटर आणि फोमच्या गादया तसेच औषधं इत्यादींचे वितरण केले जाते.

सावन कृपाल रुहानी मिशन चे अध्यक्ष संत राजिंदर सिंह जी महाराज सध्या संपूर्ण विश्वभरात ध्यान-आभासा द्वारे प्रेम, एकता व शांतिचा संदेश प्रसारित करीत आहेत, परिणामी विविध देशांद्वारे त्यांना अनेक शांति पुरस्कार, सन्मानपत्र व डॉक्टरेट च्या ५ पदव्या देऊन सम्मानित केले गेले आहे.

सावन कृपाल रुहानी मिशन ची विश्वभरात साधारण ३२०० हुन अधिक केंद्र स्थापित आहेत, तसेच मिशन चे साहित्य विश्वातील ५५ हुन अधिक भाषांमध्ये प्रकाशित केले गेले आहे. याचे मुख्यालय विजय नगर, दिल्ली येथे आहे, तसेच अंतरराष्ट्रीय मुख्यालय नेपरविले, अमेरिकेत स्थित आहे.


जनसंपर्क अधिकारी,
सावन कृपाल रुहानी मिशन,

अमृता : +91 84510 93275

No comments:

Post a Comment

कोकण मराठी साहित्य परिषदच्या केंद्रीय सहकार्यवाह पदी शीतल करदेकर यांची नियुक्ती !

कोकण मराठी साहित्य परिषदच्या केंद्रीय सहकार्यवाह पदी शीतल करदेकर यांची नियुक्ती ! मुंबई (शांताराम गुडेकर) :           कोकण मराठी...