Friday, 13 May 2022

श्री शिवशक्ती उत्कर्ष मंडळ कासारकोळवणच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम थाटामाटात संपन्न !

श्री शिवशक्ती उत्कर्ष मंडळ कासारकोळवणच्या २५ व्या  वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम थाटामाटात संपन्न !



मुंबई, ( शांताराम गुडेकर ) :
          रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुका मधील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कासार कोळवण गावातील सरकार मान्य श्री शिवशक्ती उत्कर्ष मंडळाचा २५ वा वर्धापनदिन सोहळा थाटामाटात संपन्न झाला. 


श्री शिवशक्ती उत्कर्ष मंडळ हे सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक, कला, क्रीडा, धार्मिक अशा विविध क्षेत्रात कार्यरत मंडळाच्या वतीने गेली २५ वर्ष अनेक प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले आहे  व या मंडळास ४ राज्यस्तरीय व १ नॅशनल पुरस्कार प्राप्त झालेआहेत. 


एक उत्तम सामाजिक संघटना म्हणून नावलौकिक आहे. मंडळाच्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने दिनांक १० मे २०२२ ते १२ मे २०२२ असा तीन  दिवस साजरा करण्यात आला. यनिमित्ताने  विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा, बॉक्स क्रिकेट टूरनामेन्ट, विध्यार्थी गुणगौरव, जेष्ठ नागरिक सत्कार समारंभ, महिलांसाठी हळदीकुंकू, धार्मिक विधी काकड आरती, होम हवन, साई बाबांच्या पादुकांची भव्य मिरवणूक, साई भंडारा महाप्रसाद, रेकार्ड डान्स व सांस्कृतिक कार्यक्रम लोकांच्या मनोरंजनासाठी श्री महालक्ष्मी नाट्य नमन मंडळ, रत्नागिरी, खेडशी असे विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 


या कार्यक्रमासाठी मंडळाचे प्रेरणास्थान उद्योगपती विश्वजित चिंदरकर साहेब व विद्यमान आमदार शेखरजी निकम साहेब, सामाजिक कार्यकर्ते युयूस्तू आर्ते साहेब, उप सरपंच प्रकाश तोरस्कर, मा.श्री. प्रमोद अधटराव (भाजप जिल्हाध्यक्ष, रत्नागिरी), मा.श्री. रुपेश कदम (भाजप युवा अध्यक्ष), मा. श्री रमेशजी कानावले (समाजसेवक), मंडळ अध्यक्ष रवींद्र सि. करंबळे, सचिव शैलेश दळवी, खजिनदार राजेंद्र शं. करंबळे व विविध क्षेत्रातील मान्यवर यांची उपस्थिती लाभली. या संपूर्ण कार्यक्रमाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला असे मंडळ चे मोहन कदम यांनी बोलताना सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  मंडळ पदाधिकारी, सदस्य व सभासद, महिला मंडळ पदाधिकारी, सदस्य, युवा मंडळ पदाधिकारी, सदस्य यांनी विशेष मेहनत घेतली.

No comments:

Post a Comment

निळजे गाव येथे आई एकवीरा देवी पदयात्रा पालखी सोहळा मोठया भक्तिमय वातावरणात संपन्न ! ** ह. भ. प. श्री जितेन्द्र महाराज पाटील यांच्या कीर्तनान...