म्हारळ गावात विकास कामांना प्रांरभ, नवीन पाईप लाईनचे उद्घाटन !!
कल्याण, (संजय कांबळे) : बहुचर्चित म्हारळ गावातील विकास कामांना अखेरीस सुरुवात झाली, आज म्हारळ गाव प्रवेशव्दार ते रोज वाईन्स अशा ३०० मीटर नवीन पाईप लाईनचे उद्घाटन नुकतेच झाले, त्यामुळे नागरीकांनी समाधान व्यक्त केले.
कल्याण तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या म्हारळ ग्रामपंचायतीचे तत्कालिन ग्रामविकास अधिकारी श्री वाघचोडे हे गेल्या अनेक दिवसापासून गैरहजर असल्याने त्यातच सरपंच, उपसरपंच व काही सदस्य यांचा व त्यांचा वाद विकोपाला गेला असल्याने नागरीकांची कामे खोळंबलेली होती, अनेक नागरीकांनी, पंचायत समिती सदस्यांनी या बाबत गटविकास अधिकारी, कल्याण यांचेकडे तक्रार देखील केली होती, अखेर गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी म्हारळ ग्रामपंचायतीसाठी जी आर कुटेमाटे यांची आँर्डर काढली, दोनच दिवसापूर्वी त्यांनी पदभार स्विकारला व लगेच कामांना सुरुवात केली.
कल्याण मुरबाड रस्त्याशेजारी असलेल्या सिड्राम सोसासटी (रोज वाईन्सच्या मागे) येथील नागरीकांना जिर्ण जुनाट पाईपलाईन मधून पाणी येत नसल्याने म्हारळगाव प्रवेशव्दार ते ही सोसायटी अशी ३०० मीटर लांबीची व ३ इंचाची नवीन लाईन टाकण्याच्या कांमाचे उद्घाटन आज झाले, हे काम अडिज ते तीन लाखांचे असून ते लवकरात लवकर सुरु करण्यात येणार आहे,
यावेळी म्हारळ ग्रामपंचायत सदस्य प्रकाश चौधरी, श्रीमती बेबीताई सांगळे, किशोर वाडेकर, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश देशमुख, प्रकाश कोंगिरे, मनसेचे विवेक गंभीरराव ग्रामसेवक जे आर कुटेमाटे, परिसरातील ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना सदस्य प्रकाश चौधरी म्हणाले,की आम्ही नागरीकांची माफी मागतो, कारण या अगोदर चे ग्रामसेवक वारवांर गैरहजर राहत असल्याने नागरीकांची, कामे होत नव्हती, विकास कामे थांबली होती पण आता ग्रामसेवक श्री कुटेमाटे हे आल्याने आता गैरसोय होणार नाही, असे सांगून नागरीकांनी सहकार्य करण्याचे अवाहन केले.
No comments:
Post a Comment