Thursday, 2 June 2022

प्रेमाची अनोखी परिभाषा सांगणारा मजनू चित्रपट रसिकांच्या भेटीला !! *( 10 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित )*

प्रेमाची अनोखी परिभाषा सांगणारा मजनू चित्रपट रसिकांच्या भेटीला !!

*( 10 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित )*


प्रेमाची अनोखी परिभाषा सांगणारा मजनू हा चित्रपट असून या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे हे आहेत. प्रत्येकजन कॉलेजला गेल्या नंतर स्वतःला मजनू समजतो जे लोक हा चित्रपट पाहतील त्यांना त्यांच्या कॉलजेच्या दिवसांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही, तसेच प्रेमाची सुरुवात एकदम चांगल्या प्रकारे होती, चांगल्या प्रमाणे प्रेमाचा शेवट झाला पाहिजे त्यासाठी कसं प्रेम करायचं ते मजनू चित्रपटात अगदी अचूकपणे एका आगळ्यावेगळ्या प्रेम कहानी तून सर्वांना पहायला आवडेल. 


मजनू चित्रपट जे पाहतील त्यांची प्रेमकहाणी नक्की अजरामर होईल मजनू चित्रपट खूप चांगला फॅमिली पॅक चित्रपट आहे म्हणून सर्वांनी हा चित्रपट पहावा, कोरोनाच्या काळात सर्व काळजी घेवून चित्रित झालेला हा चित्रपट आहे. "मजनू" चित्रपटात रसिकांना फाईट, एक्शन, रोमान्स तसेच लव्हस्टोरी अशा बऱ्याच गोष्टी पहायला मिळणार आहेत असे मतं दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी व्यक्त केले. 



या चित्रपटात कलाकार नव्या दमाचा अभिनेता रोहन पाटील, नितीश चव्हाण, अरबाज शेख, मिलिंद शिंदे, सुरेश विश्वकर्मा, प्रणव रावराणे, श्वेतलाना अहिरे, अदिती सारंगधर, माधवी जुवेकर हे आहेत. तर साऊथचे कॅमेरामन एम. बी अलीकट्टी नृत्य दिग्दर्शक साऊथचे हाईट मंजू हे आहेत. साउंड राशी बुट्टे, आर्ट महेश कोरे यांनी केले आहे. तर हा चित्रपट १० जूनला रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल. 



मजनू या चित्रपटाचे निर्माते गोवर्धन दोलताडे, भरत चंगेडे, डॉ. दीपाली गर्जे सानप, सह निर्माते इरफान. एम.भोपाली, कार्तिक दोलताडे हे असून संगीतकार पी शंकरम्, सचिन अवघडे, साजन - विशाल, पार्श्वसंगीत पी. शंकरम्, विनीत देशपांडे यांचे आहे. तर गीतकार दीपक गायकवाड, गोवर्धन दोलताडे, साजन बेंद्रे, अविनाश गांगोडे, गायक सलमान अली, आदर्श शिंदे, आनंदी जोशी, बेला शेंडे, संदीप उबाळे, विशाल चव्हाण हे आहेत. अशी महिती मजनू चित्रपटाचे निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी दिली.

अधिक माहितीसाठी संपर्क :-

जनसंपर्क मीडिया सर्विसेस रामकुमार शेडगे - 9890775696

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...