मुरबाडचे भुमिपुत्र "पत्रकार रमेश घरत" ३ जून रोजी दिसणार आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर !!
मुरबाड { मंगल डोंगरे } :
मुरबाड तालुक्यातील करचोंडे गावचे पत्रकार व कवी ३ जून रोजी आकाशवाणीच्या "अस्मिता वाहिनीवर" पर्यावरण दिनानिमित्त रसिक श्रोत्यांच्या भेटीला येणार आहेत. कामगार सभेच्या या विशेष कार्यक्रमात ते पाणी या विषयावर आपलं अभिभाषण सादर करणार आहेत . "पाणी" या विषयावर कविता सादर करणार आहेत.
मुरबाड तालुक्यातील टोकावडे गावाजवळील करचोंडे छोटेसे खेडेगावातून १९९४ साली पत्रलेखन ते पत्रकारिता असा प्रवास सुरू केलेले रमेश घरत यांनी ठाणे मुंबईच्या व्रुत्तपत्रामध्ये बातमी पत्र, पत्र लेखन करून आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. अशा लिखाणाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. ग्रामीण भागातील पाणी, रस्ता, वीज, आरोग्य, शैक्षणिक आणि सामाजिक अशा विविध विषयांवर त्यांनी सडेतोड लिखाण केलेले आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्वात जुने वृत्तपत्र सन्मित्र तून त्यांनी पत्रलेखनाला सुरुवात केली. सन्मित्र चे संपादक स.पा. जोशी हे त्यांचे पत्रकारितेतील गुरु होते.
दैनिक सन्मित्र बरोबरच त्यांनी दैनिक सागर मध्ये उपसंपादक या पदावर काम केले आहे. त्यांनी विविध विषयांच्या आणि अनुभवाच्या जोरावर पत्रकारिता करीत असताना, विविध प्रकारचे काव्य त्यांनी साकारले आहे. मुंबई आकाशवाणीच्या संगीत विभागातील रघुनाथ फडके यांच्या उत्तम मार्गदर्शनामुळे त्यांना आकाशवाणीवर एक कार्यक्रम करण्याची संधी मिळाली आहे. त्या संधीचे त्यांनी सोने केले आहे. आतापर्यंत त्यांना अनेकदा आकाशवाणीवर कार्यक्रम करण्याची संधी मिळाली आहे. याबाबत कामगार सभेचे कार्यक्रमाधिकारी अनिल कुमार पिंगळे तसेच हर्षदा प्रभू बाहू यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. दैनिक देश मोर्चाचे संपादक रवींद्र खांडेकर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
रमेश घरत यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ठाणे जिल्ह्यातील तसेच विशेष करून मुरबाड तालुक्यातील पत्रकार कवी साहित्यिक यांच्या कडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:
Post a Comment