गटार अमावस्या निमित्ताने बहुजन विकास आघाडी च्या कार्यकर्त्यांचे स्नेहभोजन !
जव्हार- जितेंद्र मोरघा :
जव्हारतालुक्याचे बहुजन विकास आघाडी अध्यक्ष एकनाथ जी दरोडा यांनी बहुजन विकास आघाडी जव्हार तालुका वतीने धोंडपाडा पैकी गारादेवी येथील मैदानावर दीपपुजा अमावस्या (गटार अमावस्या) निमित्त कार्यकर्त्यांचं स्नेहभोजन आयोजीत केले होतं. या वेळी पक्षांच्या अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष वाढी सोबतच आपआपले अनुभव देखील व्यक्त करून स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.
'बहुजन विकास आघाडी' हा पालघर जिल्ह्यांतील एक नामांकित पक्ष आहे. मा. हितेंद्रजी ठाकुर हे या पक्षाचे पक्षप्रमुख आहेत. गेली अनेक वर्षांपासुन कार्यकर्त्यांनी आपल्या कामाच्या जोरावर पालघर जिल्हातील खुद्द पालघर, वाडा, मोखाडा, डहाणु, तलासरी, विक्रमगड, वसई, व जव्हार या आठ ही तालुक्यात बहुजन विकास आघाडी पक्ष वाढवला आहे. दरम्यान जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथ जी दरोडा यांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांसाठी दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी स्नेहभोजन आयोजीत केले होते. कारण येत्या शुक्रवार पासुन श्रावण सुरु होत आहे. बहुतेक लोकं मांसाहारी खाणे बंद करतात याचेच औचित्य साधुन सर्व एकत्र आले व सहभोजन योजले. सदरचे आयोजन तालुका पक्ष प्रमुख एकनाथ जी दरोडा यांच्या कडुन होते. या वेळी पक्षाच्या उपस्थीत कार्यकत्यांनी आप आपले मनोगत व्यक्त करून पक्षासोबतचे वेगवेगळे अनुभव सांगितले. अनंता धनगरे यांनी सांगितले कि "कै. दत्तात्रय घेगड साहेबांनी स्नेह भोजनाची परंपरा चालु केली होती यास्तव आपण देखील ती प्रत्येक दीपपुजा अमावस्याला देत आहोत. तरी योग्य प्रमाणे भोजन करून व्यवस्थित आपल्या घरी जा" असे धनगरे यांनी सांगितले. तसेच "कार्यकर्त्यांचा जोश, उत्साह वाढवण्यासी आपण दरवर्षी ही पार्टी देत आहोत. तसेच आपले तालुका अध्यक्ष प्रशासनाला तात्काळ भेटुन प्रश्न सोडवुन घेतात असे सांगुन नेटवर्क टॉवर, घरांची पडझड व तालुक्यातील रुग्णांनांची हेळसांड" ही उदाहरणे देत लक्ष्मण पारधी यांनी थेट दरोडा यांच्या कामाच्या पद्धतीची आठवन करून दिली. तसेच दिलीप वाघ हे एक नव निर्वाचीत कार्यकर्ते आहेत. ते पायाने १००% अपंग आहेत. त्यांनी आपल्या भाषणात म्हटले की "मी जव्हार तालुक्यात कित्येक वर्ष शिवसेना, बिजेपी पक्षात काम करत होतो. पण तेथे मी जनतेची तर नव्हेच परंतु स्वतःचे काम देखील करण्यास असमर्थ ठरत होतो. जेव्हा पासुन बहुजन विकास आघाडीत काम करतोय तेव्हा पासुन तालुक्यातील लोक पक्ष प्रमुख एकनाथ जी दरोडा यांच्या सोबतच माझे देखील भरभरून कौतुक करतात. विशेष म्हणजे खास तालुका कार्यालयात येऊन लोकं दरोडा यांच्या कामाची प्रशंसा करतात. म्हणुन खुप आनंद होतो" असे दिलीप यांनी सांगितले. तसेच संजय भला हे दरोडा यांच्या व्यक्तीमत्व व स्वभावाबद्द व्यक्त होताना सांगितले कि एकनाथ दरोडा हे अतिशय साधं व्यक्तीमत्व आहे. त्यांना अजिबात घमेंड व बडेजाव नाही. इतकं साधं राहणीमान आहे. त्यांच्या सोबत काम करतांना आम्हाला अभिमान वाटतो" असे देखील भला बोलले. सर्वांची भाषणे संपल्यानंतर एकनाथ दरोडा यांनी देखील सर्व उपस्थीत मान्यवरांचे आभार मानुण मनोगत व्यक्त केले. "दिवंगत तालुका अध्यक्ष कै. दत्तात्रय घेगड साहेब यांच्या कामाची पद्धत जपुन सदरचं स्नेहभोजन देत आहोत असे त्यांनी म्हटले." या वेळी मतदारांना महत्व देत ते बोलले कि "आपण तालुक्यातील गरजु लोकांच्या घरी जाऊन त्यांची विचारपुस करतो व समस्या जानुण घेतो. कधी काळी अचानक लोकं आपलं काम बघुन दुरध्वनी करतात म्हणुन तात्काळ त्यांच्या घरी जातो. यास्तव कधी-कधी कार्यालयात उपस्थीत नसतो. तरी देखील इतर कार्यकर्ते त्यांच्या समस्या सोडवतात किंबहुना मला नंतर सांगतात. व त्या लगेचच कार्यकर्त्यांच्या मदतीने आपण सोडवण्याचा अतोनात प्रयत्न करतो. तसेच येत्या काही दिवसात ग्रामपंचायत निवडनुका जाहीर होतील तरी जास्तीत जास्त सुशिक्षीत तरुणांनी आपला सहभाग नोंदवा व गावच्या विकास कामात लक्ष द्या व बहुजन विकास आघाडी पक्ष वाढवा" असे देखील एकनाथ जी दरोडा यांनी जमलेल्या सर्व शिलेदारांना सुचित केले. या वेळी त्यांच्या सोबत सचिव रामचंद्र मौले, उपाध्यक्ष अनंता धनगरे, नितीन पाटील, हरी बरफ, सल्लागार वसंत दिघा, काशिनाथ दरोडा, भगवान दरोडा, गणपत दरोडा, जगन खानझोडे, माजी सरपंच तुकाराम गरेल, दत्तू बरात, संतोष सोळे, सुनील वळवी, निलेश घेगड, हरी दादा व इतर ही तालुक्यातील तमाम कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:
Post a Comment