Thursday, 28 July 2022

भानूदास घराणे -श्री महालक्ष्मी कलामंच जोपासतायत गुरुपरंपरा ५ ऑगस्ट रोजी शक्ती-तुरा जंगी सामन्याला उपस्थित राहण्याचे केले आवाहन.!

भानूदास घराणे -श्री महालक्ष्मी कलामंच जोपासतायत गुरुपरंपरा ५ ऑगस्ट रोजी शक्ती-तुरा जंगी सामन्याला उपस्थित राहण्याचे केले आवाहन.!


*[ निवोशी / गुहागर : - उदय दणदणे ]*

कोकण म्हणजे कलेचं माहेरघर कोकणात सण उत्सवाबरोबर लोककलाही जोपासल्या जात आहेत. नमन, भारुड आणि शक्ती-तुरा या पिढ्यानपिढ्या जोपासल्या जाणाऱ्या लोककला पैकी एक कोकणची बहुप्रिय लोककला अर्थात शक्ती-तुरा या कलेचं संवर्धन व्हावं, जतन व्हावं, तिचा प्रसार व प्रचार व्हावा तसेच गुरुपरंपरा चालू राहून त्यांचा मानसन्मान राखला जावा या साठी प्रयत्नशील राहून नवनवीन शाहीर घडावेत हे एकमेव ध्येय मनाशी बाळगून अनेक वर्षे या लोककला व कलाकार यांना व्यासपीठ मिळावं म्हणून अनेक संस्था, मंडळे मुंबई मायनगरीत रंगमंचावर स्थानिक कलाकारांना संधी उपलब्ध करून देत आहेत. अशीच एक कलाकारांना व्यासपीठ देण्याचे कार्य अर्थात भानुदास घराणे-श्री महालक्ष्मी कला पथक मुंबई हे मंडळ गेली अनेक वर्षे करीत आहे. 
आजपर्यंत या मंडळाने सन २०१० साला पासून अनेक नामवंत शाहीर मंडळी यांचा मानसन्मान राखत आदर निर्माण केला आहे. सन २०१४ साली "सन्मा.गुरुवर्य सन्मान" सोहळ्याचे नियोजन करून गुरू परंपरा जोपासली. तदनंतर सन २०१९ साली भानुदास घराणे- महालक्ष्मी कला पथक - मुंबई या पथकातील जवळ जवळ ५० शाहीरांचा दामोदर नाट्यगृह परेल, मुबंई रंगमंचावर सन्मान करून एक वेगळाच आदर्श समाजापुढे ठेवला आहे.असे अनेक नवनवीन शाहीर मंडळी या घरण्यातून उदयास आली आहेत. त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी पुन्हा एकदा भानुदास घराणे- श्री महालक्ष्मी कला पथक मुंबई सन्मा. गुरुवर्य श्री नारायणजी चापडे, वस्ताद श्री अर्जुन भुवड, श्री कृष्णा जोगले आणि त्यांची शिष्य परिवार आयोजित शक्ती- तुऱ्याचा जंगी सामना शुक्रवार दि.५ ऑगस्ट २०२२ रात्री ८:३० वा.दामोदर नाट्यगृह परेल मुंबई -१२ येथे *शक्तीवाले- भानुदास घराणे श्री महालक्ष्मी कला पथक मुंबई चे "शाहीर : भिकाजी भूवड यांचे शिष्य शाहीर : विष्णू मुदगल नारडुवे आणि सहकारी विरुद्ध  तुरेवाले - बाबू रंगले घराण्यातील शाहीर : -प्रमोद गुरव देवधे - लांजा* यांच्या सादरीकरणात हा रंगतदार कार्यक्रम होणार असून माय बाप रसिक प्रेक्षकांनी या दोन्ही शाहिराना आशिर्वाद देण्यासाठी उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी शाहीर सुनील मोगरे- ९८९२७२१०७९ , शाहीर दिपक म्हादये - ८२०८५९७५३८ शाहीर अनंत गुडेकर- ९३२०४६५०४९ यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

६३ वा नागरी संरक्षण व होमगार्ड्स संयुक्त वर्धापन दिन (सप्ताह) सांगता समारोप एचिव्हर्स कॉलेज, कल्याण येथे उत्साहात !!!

६३ वा नागरी संरक्षण व होमगार्ड्स संयुक्त वर्धापन दिन (सप्ताह) सांगता समारोप एचिव्हर्स कॉलेज, कल्याण येथे उत्साहात !!! कल्याण प्र...