कलगी तुरा समाज उन्नती मंडळाची ३१ जुलै रोजी महत्वपूर्ण विषयांवर देवरूख मध्ये सभेचे आयोजन !!
*[ ठाणे- उदय दणदणे ]*
कलगी तुरा समाज मंडळ (मुबंई) "संलग्न-समन्वय समिती" वतीने रविवार दिनांक. ३१ जुलै २०२२ रोजी सकाळी ११ वाजता शिवकृपा मंगल कार्यालय, मु.पो.पाटगाव (पाटगाव तीठा ) देवरुख, ता.संगमेश्वर जि. रत्नागिरी येथे कोलाड, महाड,चिपळूण, लांजा, देवरुख, राजापूर, व मुबंई मंडळ, विभाग समन्वय समिती आणि सदस्य यांची संयुक्त सभा श्री अनंत तांबे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.
सदर आयोजित केलेल्या सभेमध्ये मागील वर्षातील घडामोडींचा आढावा घेऊन भावी योजनांचा ठराव निश्चित करणे तसेच समन्वय समिती नेमणुकीत नव्याने नेमणूक करून समन्वय समिती संघटनेबद्दल नियोजन करणे. जाखडी नृत्यातील कलाकार आणि कलापथक अथवा मंडळ यांच्या उन्नती बाबत विचारविनिमय करून नियोजन करणे. त्याच प्रमाणे समन्वय समितीच्या ठराव नियमांचे उल्लंघन करून संस्थेपासून दुरावलेल्या शाहीर यांना समज देऊन त्यांच्या बद्दल फेरविचार करून सर्वानुमते अंतिम निर्णय घेण्याबाबत तसेच शंभूराजू घराण्याचे गुरुवर्य कै.काशीराम (बुवा) कुंभार यांना " ब्रह्मनिष्ठ " ही पदवी लावून "ब्रह्मनिष्ठ" याच नावाने संबोधण्यावरून झालेला वाद संपुष्टात येण्यासाठी त्याबाबत चर्चा करून अंतीम निर्णय निश्चित करणे बाबत आणि समन्वय समिती अध्यक्ष व सदस्य यांच्या वतीने येणारे इतर विषय अशा महत्व पूर्ण विषयांवर सदर सभेचे आयोजन करण्यात आले आहे सर्व विभागीय समन्वय समिती सदस्य यांनी सदर नियोजित सभेला वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन कलगी तुरा समाज उन्नती मंडळ मुबंई संलग्न- समन्वय समितीच्या वतीने दि.२० जुलै २०२२ रोजीच्या प्रसिद्ध झालेल्या परिपत्रकातुन केले आहे.

No comments:
Post a Comment