Friday, 29 July 2022

गणेश भक्त कोकणवासी प्रवासी संघ मुंबई (नोंदणीकृत) चे दादरमध्ये स्नेहसंमेलन !

गणेश भक्त कोकणवासी प्रवासी संघ मुंबई (नोंदणीकृत) चे दादरमध्ये स्नेहसंमेलन !


मुंबई, (शांताराम गुडेकर) :

        गणेशभक्त कोकणवासी प्रवासी संघ मुंबई (नोंदणीकृत) च्या माध्यमातून प्रवासी सभासद यांच्यासाठी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी दादर येथे शिवाजी मंदिर नाट्यमंदिरात रविवार दिनांक ७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ९:३० वाजता स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ तसेच विद्यार्थी सत्कार आणि गुणवंत कार्यकर्ता सत्कार केला जाणार आहे. शिवाय मनोरंजनासाठी विनोदी नाटक "वन्स मोअर तात्या" आयोजीत करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम अध्यक्ष श्री.रविंद्र मुकनाक यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख मार्गदर्शक श्री. दीपक चव्हाण (कार्याध्यक्ष) आणि प्रमुख संघटक अनिल काडगे यांच्या मार्गदर्शनासाठी होणार आहे. गणपती उत्सव व आषाढी एकादशी व इतर वेळोवेळी सेवा व उपलब्ध उपक्रम सुद्धा राबवले जातात.यावर्षी गणपती सणासाठी एकूण ७०० एसटी गाड्यांचे बुकिंग गणेशभक्त कोकणशी प्रवासी संघाच्या माध्यमातून बुकींग करण्यात आल्या आहेत. एस.टी. चालावी हा एकमेव उद्देश गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघाच्या व पदाधिकाऱ्यांच्या मनात असतो. श्री विश्वनाथ मांजरेकर, खजिनदार हे आपल्या वयाकडे न पाहता संघटनेसाठी काम करतात. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुर्ला विभाग - भास्कर चव्हाण (अध्यक्ष), रमेश बने, रणजीत वरवटकर, परेल विभाग - रमेश तेजम (अध्यक्ष), मधुकर जोईल, शंकर घोरपडे, मुंबई सेंट्रल विभाग श्रीधर आंग्रे (अध्यक्ष), एकनाथ नाचरे, अशोक नाचरे, शंकर गुरव, बोरिवली विभाग - किशोर सावंत (अध्यक्ष), लक्ष्मण मंचेकर, भागोजी सोलकर, नालासोपारा विभाग - अजित दवंडे, संजय जावळे, रमेश आंग्रे, अर्नाळा विभाग - गणेश फिलसे, संजय जावळे, पंढरपूर विभाग - गंगाराम खांडेकर, तुकाराम पावले, बाबल्या तेरवणकर हे सर्व कार्यकर्ते मेहनत घेत आहेत. या सर्वांचे श्री. चंद्रकांत बुदर (सचिव) यांनी आभार व्यक्त केले असून गणेश भक्त कोकणवासी प्रवासी संघ मुंबई (नोंदणीकृत)चे रविवारी दादरमध्ये स्नेहसंमेलन होत आहे. या स्नेहसंमेलन कार्यक्रमास पदाधिकारी, सदस्य व सभासद यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संघातर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

जॉय सामाजिक संस्था मुंबई (रजि.) तर्फे कोकण सुपुत्र शांताराम गुडेकर यांची "आदर्श पत्रकार पुरस्कार -२०२५" साठी निवड !!

जॉय सामाजिक संस्था मुंबई (रजि.) तर्फे कोकण सुपुत्र शांताराम गुडेकर यांची "आदर्श पत्रकार पुरस्कार -२०२५" साठी निवड !! म...