Friday 29 July 2022

रोटरी क्लब ऑफ कल्याण तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार !!

रोटरी क्लब ऑफ कल्याण तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार !!


कल्याण, बातमीदार : कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयातील रोटरी सभागृहात कल्याण मधील सर्वच माध्यमाच्या दहावी व इतर गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव व सत्कार रोटरी क्लब ऑफ कल्याण तर्फे करण्यात आला. या वेळी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण मंडळा मुख्य शिक्षण अधिकारी विजय सरकटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर कार्यकमाचे मुख्य आयोजक रोटरी क्लब ऑफ कल्याणचे अध्यक्ष रोटरियन मदन शंकलेशा व सचिव पराग कापसे प्रकल्प अध्यक्ष महेश गाला, मंचकावर उपस्थित होते.


या वेळी प्रमुख पाहुणे असलेले केडीएमसी शिक्षण अधिकारी विजय सरकटे यांनी बोलताना सांगितले की, विद्यार्थी हे या स्पर्धेचे युगामध्ये मेहनत करीत आहेत. पूर्वी स्पर्धा नव्हती. आता माहितीचा विस्फोट झालेला आहे. यात विद्यार्थ्यानी चांगले काय आहे ते घ्यायचे आहे. जीवनात यश अपयश ही एक संख्या असते. चांगला माणूस घडण्यासाठी तयार असायला पाहिजे. दहावी नंतर आपण घडत असतो कॉलेज जग हे वेगळे असते. येथे ज्ञानाच्या कक्षा वाढत असतात. आजू बाजूच्या परिसर कसा आहे या बरोबरच चांगले वाईट समजले पाहिजे. विद्यार्थ्यांनी उच्च पद मिळे पर्यंत मेहनत करायला पाहिजे. असे या वेळी विजय सरकटे यांनी बोलताना सांगितले. तर रोटरी क्लब ऑफ कल्याणचे अध्यक्ष रोटरियन मदन शंकलेशा यांनी बोलताना सांगितले की, दर वर्षी आम्ही टॉपर विद्यार्थ्याचा सत्कार करीत असतो. पण या वेळी आम्ही मराठी बरोबरच इंग्रजी, उर्दू , गुजराथी, हिंदी माध्यमांच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करीत आहोत.ज्या मुळे त्या मुलाचं गुणगौरव होत नाही त्या विद्यार्थांचा सत्कार आम्ही रोटरी तर्फे करीत असतो. रोटरी क्लबच्या माध्यमातून आम्ही अनेक समाजकार्य ही करत असतो. समाजसेवक अषोक लक्ष्मणदास खंडेलवाल यांच्यातर्फेही मुलांना रोख रक्कम देण्यात आली. या वेळी १० वीच्या व इतर विद्यार्थीचा गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती प्रकाश पवार यांनी केली. या कार्यक्रमा प्रसंगी शहरातील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येमध्ये उपस्थित होते. यावेळी केडीएमसी शिक्षण अधिकारी विजय सरकटे, रोटरी क्लब ऑफ कल्याण चे अध्यक्ष मदन शंखलेशा, सचिव पराग कापसे, प्रकल्प अध्यक्ष महेश गाला, गुलकंदी देवी खंडेलवाल, ॲड. संदीप पटेल, स्मृती पवार रोटरी क्लब चे कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सौजन्य ; इंडिया टी. व्ही. न्युज नेटवर्क, कल्याण

No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...