भिवंडी, दिं २८, अरुण पाटील (कोपर) :
देशभरातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी तरुणांना वयाची १८ वर्षे पूर्ण होण्याची वाट पहावी लागणार नाही. त्यांना १७ वर्ष पूर्ण झाल्यानंतर लगेचच मतदार ओळख पत्रासाठी अर्ज करता येईल. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार व निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांनी सर्वच राज्यांतील संबंधित अधिकाऱ्यांना यासंबंधीचे निर्देश दिलेत.
पूर्वी तरुणांना १८ वर्षे पूर्ण झाल्यानतंर मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी १ जानेवारीची वाट पहावी लागत होती. पण आता १७ वर्ष पूर्ण होताच त्यांना १ एप्रिल,१ जुलै व १ऑक्टोबर असे वर्षातून ३ वेळा त्यांना नाव नोंदणीसाठी अर्ज करता येईल. नव्या निर्देशांनुसार, मतदार यादी प्रत्येक ३ महिन्यांना अपडेट होईल. पात्र तरुणांची नावे पुढील वर्षाच्या तिमाहीत व्होटर लिस्टमध्ये जोडण्यात येईल.
आयोगाने सांगितले की, नोंदणी झाल्यानंतर तरुणांना एक मतदार ओळखपत्र दिले जाईल. सद्यस्थितीत व्होटर लिस्ट २०२३ साठी दुरुस्त केली जात आहे.निवडणूक आयोगाने आधार क्रमांक मतदार यादीशी लिंक करण्याचीही प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी १ ऑगस्ट ते ३१ डिसेंबरपर्यंत विशेष मोहीम राबवली जाईल. या मोहिमेत मतदार यादीत समाविष्ट प्रत्येकाचे नाव आधार क्रमांकाशी जोडल जाईल.
No comments:
Post a Comment