Wednesday, 27 July 2022

संत नामदेव महाराज यांचा ६७२ वा संजीवन समाधी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न !

संत नामदेव महाराज यांचा ६७२ वा संजीवन समाधी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न !


मुंबई, (शांताराम गुडेकर) :
            संत नामदेव महाराज यांचा ६७२ वा संजीवन समाधी सोहळा संपूर्ण भारतात व पंजाब मधील धुमान येथे मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात संपन्न झाला. ठिकठिकाणी नामदेव महाराज यांच्या मूर्तीची पूजा अर्चना करून हरिपाठ, नामदेव आरती, भजन कीर्तन, विठूनामाचा गजर अशा भरगच्च कार्यक्रमांची अखणी कारण्यात अली होती. 


संत नामदेव महाराज हे केवळ महाराष्ट्रपुरतेच मार्यदित नव्हते तर त्यांनी पंजाब पर्यंत भागवत धर्माचा प्रचार प्रसार केला. गुरू ग्रंथसहीबा या पवित्र ग्रंथात नामदेवांच्या ओव्या (नामदेवजी की मुखबानी) आढळून येतात, तर पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी समाधी घेत पायरीचा दगड होण्यात त्यांनी धन्यता मांडली. 


पंढरपूर नामदेव पायरीला वंदन करून व माथा टेकवून भक्त विठोबाचे दर्शन घेत पुढे जात असतात. मुंबईत देखील जोगेश्वरी, घटकोपर, ठाणे, कल्याण, खेतवाडी-गिरगाव, पनवेल, भिवंडी, पंढरपूर,  पुणे, नारायणगाव, घोडेगाव व इतर अनेक ठिकाणी नागरिक- भक्तांनी एकत्र येत संजीवनी समाधी सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला. 


या संजीवन समाधी सोहळ्या निमित्ताने नामदेव समाजोनती परिषद पुणे यांच्या वतीने ४ ते २४ नोव्हेंबर २०२२ अशी २१ दिवसांची पंढरपूर ते घुमान (पंजाब) अशी भव्य सायकल वारीचे अयोजन सुद्धा करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment

सैतवडे येथील उझैर आदिल चिलवान यांना पी. एच डी पदवी !!

सैतवडे येथील  उझैर आदिल चिलवान यांना पी. एच डी पदवी !! रत्नागिरी जिल्ह्यातील सैतवडे येथील  उझैर आदिल चिलवान (डॉ. आदिल महामूद चिल...