Wednesday, 20 July 2022

*दावडी परिसरातील नागरी समस्या सोडविण्यासाठी आयुक्तांनी लक्ष घालावे - शिबू शेख

*दावडी परिसरातील नागरी समस्या सोडविण्यासाठी आयुक्तांनी लक्ष घालावे - शिबू शेख 


कल्याण, बातमीदार : दावडी परिसरातील समस्या नवनवीन आयुक्तांनी तातडीने सोडवण्यासाठी जातीने लक्ष घालावे असे असंघटित कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिबू शेख यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट आयुक्तांनाच आवाहन केले आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त भाऊसाहेब दांडगे यांनी आपल्या पदाचा कार्यभार नुकताच स्वीकारला असून दावडी परिसरातील नागरी समस्या तातडीने सोडविण्याची विनंती शिबू शेख यांनी आपल्या सोशल मीडियातील व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे.
दावडी परिसरात नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. टँकरने पाणीपुरवठा होतो भरमसाठ टॅक्स भरून सुद्धा नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचे पाणी प्यावे लागत आहे. सोसायट्यांना पिण्याच्या पाण्यासाठी लाखो रुपये खर्च करावा लागत आहे. पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी महाविद्यालयीन विद्यार्थिनी गरोदर स्त्रिया महिला वयोवृद्ध नागरिक यांना रस्त्याने चालणे देखील कठीण झाले आहे. नागरिकांना शाळकरी मुलींना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
टू व्हीलरवर चालणे देखील कठीण झाले असून अनेकांना पाठ दुखी मान दुखी कंबर दुखी अशा समस्यांनी नागरिक पूर्णपणे त्रस्त आहेत.माजी आयुक्त डॉ.सूर्यवंशी हे दावडी गावात एकदा सुद्धा आले नसल्याचे त्यांनी आवर्जून आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.
त्यामुळे दावडी परिसरातील समस्या सोडविण्यासाठी आयुक्त भाऊसाहेब दांगडे हे दावडी भागात कधी जातात आणि या विभागाचा विकास कधी होतो याकडे संपूर्ण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नागरिकांचे लक्ष लागले आहे.

8 comments:

  1. Good job 👍👍👍

    ReplyDelete
  2. Good job 👍👌🙏

    ReplyDelete
  3. Good job... Keep it up Saheb

    ReplyDelete
  4. 👍👍good job dada 😊

    ReplyDelete
  5. Good going shibu bhai...

    ReplyDelete
  6. Good Ho b Bhai 💐🙏

    ReplyDelete
  7. Great initiative bhai

    ReplyDelete
  8. Great initiative bhai

    ReplyDelete

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...