विधवा महिलांना साठी बालसंगोपन योजना व व्याज परतावा योजना रखडलेली याची अंमलबजावणी तात्काळ सुरू करावी :- अजित संचेती,भारतीय राष्ट्रवादी पार्टी
पुणे, बातमीदार : महाविकास आघाडी सरकारच्या काळातील शेवटच्या अर्थसंकल्पात विधवा महिलांसाठी सादर केलेल्या बालसंगोपन व व्याज परतवा या दोन योजना केवळ दफ्तर दिरंगाईमुळे रखडल्या आहेत. त्यामुळे गेल्या चार ते पाच महिन्यापासून विधवा महिलांसह त्याचे पाल्यही या लाभा पासून वंचित राहत आहेत. या योजना बाबत प्रशासकीय पातळीवर केवळ चाल ढकल केली जात आहे.
त्याबाबतीत विचारणा केली असतात विविध विभागाचे मत घेऊन त्याची अंमलबजावणी होईल अशी चर्चा होत आहे.आता सरकार बदले योजनेचा काय होणार असा विचार राज्यातील विधवा महिला करत आहेत.या योजनांचा लाभ तात्काळ राज्यातील विधवा महिलांना देऊन त्यांना आपण न्याय मिळवून द्यावा अशी मागणीचे पत्र महाराष्ट्र नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथसाहेब शिंदे यांना दिलेले आहे


No comments:
Post a Comment