Sunday, 3 July 2022

एकनाथ शिंदेनी कानात सांगितले असते तर आधीच मुख्यमंत्री केले असते - अजित पवार

एकनाथ शिंदेनी कानात सांगितले असते तर आधीच मुख्यमंत्री केले असते - अजित पवार


भिवंडी, दिं,३, अरुण पाटील (कोपर) :
             राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना चांगलेच धारेवर धरले. त्याशिवाय, भाजपचे विजयी उमेदवार राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन केले. यावेळी भाषणा दरम्यान, अजित पवार यांनी भाजप नेत्यांची फिरकीही घेतली.
             एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. आणि बाहेर पडून मुख्यमंत्री पद मिळवले. त्यावर आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात भाष्य केले. एकनाथ शिंदे यांनी जर मुख्यमंत्रीपद त्यांना हवे होते हे आधीच सांगितले असते तर, त्यांना नक्कीच मुख्यमंत्री केले असते. असे सांगत अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.
             विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे विजयी उमेदवार राहुल नार्वेकर  यांचे अभिनंदन केले. राहुल नार्वेकर यांचा अभिनंदन ठराव मांडाताना नार्वेकर यांच्या राजकीय कारकीर्दीचा आढावा त्यांनी घेतला. त्यांच्या कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी मांडत त्यांना पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना त्यांनी चौफेर टोलेबाजी करत सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली.आधी सांगितले असते तर मुख्यमंत्री केले असते.
             राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करून मुख्यमंत्री पद मिळवले आहे. मात्र, एवढे करण्यापेक्षा त्यांनी जर आधी सांगितले असते तर त्यांना आम्ही नक्की मुख्यमंत्री केले असते असे सांगत आदित्य ठाकरे यांनाही त्यांनी सभागृहातच विचारले, काय आदित्य आपण केले असते का मुख्यमंत्री? यावर आदित्य ठाकरे  यांनी हसत होकारार्थी मान हलवून संमती दर्शवली.                       त्याशिवाय, सुधीर मुनगंटीवार यांच्यावरही अजित पवार यांनी फिरकी घेतली. सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा अध्यक्ष करा असे मी सुचवले होते त्यांना जे काही बडबड करायची आहे ती त्यांनी वर बसून केली असती असेही अजित पवार गमतीत म्हटले.
              भाजप नेते रडायला लागले - एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड केल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर भाजप नेते हवालदिन झाले. आपल्या हातून सत्ता गेली की काय असे त्यांना वाटू लागले. काही नेते तर अक्षरशः रडायला लागले असा टोला पवार यांनी लगावला. गिरीश महाजन तर गळ्यातला फेटा सारखा डोळ्याला लावत होते असेही अजित पवार म्हणाले.
              यावेळी बाक वाजवणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाहत अजित पवार दादा बाके वाजवू नका असे अजित पवार म्हणाले, तुम्हाला या मंत्रिमंडळात मंत्री पद मिळणार आहे की नाही हे अद्याप स्पष्ट नाही उगाच खुश होऊ नका असा टोलाही पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.
             महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपाच्या राहुल नार्वेकरांची यांची निवड झाली. गदारोळात हे मतदान पार पडले. भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार नार्वेकर यांना 164 मत मिळाले. नार्वेकरांना बहुमतापेक्षा जास्त मते मिळाली आहेत.                नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड करावी असा प्रस्ताव भाजपाकडून मांडला. महाविकास आघाडीकडून राजन साळवी यांचा प्रस्ताव मांडला. यात नार्वेकर विजयी झाले. तर महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना 107 मते मिळाली. तर तीन आमदारांनी तटस्थतेची भुमिका घेतली.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...