गोवेली पोलीस चौकीच्या मागेच वडापाव विक्रेत्या महिलेचा अज्ञाताने चिरळा गळा, परिसरात भितीचे वातावरण ?
कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण मुरबाड महामार्गावर असलेल्या गोवेली पोलीस चौकीच्या अगदी मागे आणि जिल्हा परिषद शाळा गोवेली च्या बाजूला असलेल्या वडापाव विक्रेत्या महिला अनुबाई मंगल शेलार रा. घोटसई हिचा कोणी अज्ञाताने गळा चिरला असून रक्ताच्या थारोळ्यातील तिचा मृतदेह उत्तरीय तपासणी साठी ठाणे कळवा येथे पाठविण्यात आला आहे. अगदी पोलीस चौकी पासून ५०/७५ मीटरअंतरावर अशा घटना घडल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
घोटसई गावातील अनुबाई मंगल शेलार वय ५५ वर्षे, यांना दोन मुली असून त्यांची लग्न झाल्याने त्या सासरी राहत आहेत. त्यामुळे अनुबाई या एकट्याच गावात राहत होत्या, उदरनिर्वाहासाठी गोवेली पोलीस चौकीच्या मागे आणि जिल्हा परिषद शाळा गोवेली, ग्रामपंचायत रस्त्याच्या बाजूला वडापाव व इतर गोळ्या बिस्किटे याची छोटी टपरी चालवत होत्या. परंतु अचानक त्यांच्या कोणीतरी अज्ञाताने धारधार शत्राने तिचा गळा चिरला व त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या असल्याची घटना समोर येताच, टिटवाळा पोलीस घटनास्थळी धाव घेऊन, त्यांच्या मृतदेह पुढील तपासणी करिता ठाणे कळवा येथे पाठविण्यात आला आहे.
पोलिसांच्या मतानुसार हा प्रकार सोमवारी संध्याकाळी किंवा मंगळवारी सकाळी घडला असावा. असे असले तरी गुन्हेगारांचा शोध लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
दरम्यान ही घटना गोवेली पोलीस चौकीपासून ५०/७५ मीटर अंतरावर आणि अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी घडल्याने गोवेली ग्रामपंचायत रस्त्याला झाल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

No comments:
Post a Comment