कल्याण तालुक्यात डेंग्यूचा शिरकाव, घोटसई नंतर खडवलीत संशयित डेंग्यूचा पेशंट ! अनेक ग्रामपंचायतीच्या धुर फवारण्या नाहीत ?
कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील घोटसई ग्रामपंचायत हद्दीतील स्टार रेजिन्सी या इमारतीत राहणारे सागर दशरथ पाटणे यांचा डेंग्यूचा चा अंतिम रिपोर्ट पाँझिटिव्ह आला असून यानंतर आता खडवली हद्दीतील स्वप्नील पागे हा देखील डेंग्यूचा रुग्ण सापडला असून त्याचाही रिपोर्ट पाँझिटिव्हच आल्याने चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे पावसाने उघडिप देऊन ही तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतीने धुर फवारणी केली नाही. त्यामुळे ते कशाची वाट पाहत आहेत अशी विचारणा अँड, मनोज सुरोशे यांच्या सह नागरिक करत आहेत.
मागील आठवड्यात तालुक्यातील घोटसई ग्रामपंचायत हद्दीत स्टार रेसिडेन्सी या इमारतीत राहणारे सागर दशरथ पाटणे यांना डेंग्यूची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय गोवेली येथे भर्ती करण्यात आले होते, त्यांचा डेंग्यूचे शँम्पल ठाणे येथे पाठवले होते. तोपर्यंत या पेंशटला रुग्णालयाणे डिचार्ज देखील दिला. मात्र यानंतर त्याचा रिपोर्ट पाँझिटिव्ह आला. हे होते न होते तोच आता खडवली परिसरातील स्वप्नील पागे वय ३५ याने डेंग्यूची तपासणी शहापूर रुग्णालयात केली, तो पाँझिटिव्ह आला, मात्र पत्ता फक्त खडवली इतकाच दिला, त्यामुळे त्याला शोधून काढणे मोठे अवघड झाले आहे.
मागील आठवड्यात घोटसई ग्रामपंचायत हद्दीत डेंग्यूचा रुग्ण सापडल्यानंतर कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी ग्रामपंचायतीस भेट देऊन, पाणी, धुरफवारणी, टि सी एल, आदी बाबतीत सूचना दिल्या होत्या, ऐवढेच नव्हे तर तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांना ग्रामपंचायत मध्ये योग्य प्रमाणात टिसीएल, वापरून पाणी स्त्रोत्र, शुध्दीकरणाची दक्षता घ्यावी, तसेच मलेरिया, डेंग्यू, स्वाईन फ्लू वा तत्सम साथ, रोग उदभवू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात अशा सूचना दिल्या होत्या, परंतु त्याला ग्रामसेवकानी वाटाण्याच्या अक्षता दिल्या असे वाटते, कारण, प्राथमिक आरोग्य केंद्र निळजे अंतर्गत केवळ नागाव ग्रामपंचायतीनेच धुरफवारणी केली असल्याचे खात्रीलायक माहिती आहे.
कच-याचे ढीग, सांडपाणी, तुंबलेली गटारे, घाणीचे साम्राज्य असे चित्र तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीत दिसून येते. त्यामुळे हे मोठ्या साथ रोगाची वाट पहात आहेत का ? असा सवाल अँड, मनोज सुरोशे यांनी उपस्थित केला आहे. तर अशा कामचुकार कर्मचारी व अधिकारी यांच्या वर निलबंनाची कारवाई करायला हवी असे मत सामाजिक कार्यकर्ते सुदाम भोईर यांनी व्यक्त केले.



No comments:
Post a Comment